ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पाथरी तहसीलदारांची तडकाफडकी बदली : एस. एस. हांदेश्वर पदावरून एकतर्फी कार्यमुक्त

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : जिल्ह्याचे भुमिपूत्र असलेले व सध्या पाथरी, जि. परभणी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले एस. एस. हांदेश्वर यांची तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना कार्यरत पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे आदेश महसूल व वन विभागाने दि. २२ एप्रिल २०२६ रोजी जारी केले आहेत.

शासन आदेश क्र. बदली-२०२५/प्र.क्र.२८६/आस्था-३ नुसार, श्री. हांदेश्वर यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार ही बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) नुसार हा आदेश काढण्यात आला.

  1. हा आदेश तात्काळ अंमलात आला असून श्री. हांदेश्वर यांना पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
  2. नवीन पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमित होईपर्यंत त्यांनी शासन परिपत्रक दि. ०१.१२.२०२३ नुसार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होऊन दैनंदिन उपस्थिती नोंदवावी.
  3. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार पाथरी या पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत इतर कार्यक्षम अधिकाऱ्यांकडे आजच सोपवावा व त्याबतचा अहवाल शासनास सादर करावा.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संगणक संकेतांक क्र. २०२६०४२१५२५१७४१९ असा आहे. उप सचिव महेश अशोकराव वरुडकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे. सदरच्या आदेशाची प्रत विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना पाठवण्यात आली आहे.

जस.एस.हांदेश्वर हे नांदेड जिल्ह्याचे भुमिपूत्र असून त्यांनी नायगाव,नांदेड, बिलोली, धर्माबाद अदि ठिकाणी मंडळ अधिकारी ते नायब तहसीलदार आणि तहसीलदार या पदावर काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker