ताज्या बातम्यानांदेडबिलोली

भरधाव ट्रकच्या धडकेत वयोवृद्ध गंभीर जखमी

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर नरसी जवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकची पायी जाणाऱ्या वयोवृद्धास जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात इकळीमोर ता.नायगाव येथील यादव नागोराव भद्रे हे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दि. ६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नरसी येथील ताटे यांच्या शेतासमोर घडली.

अधिक माहिती अशी की इकळीमोर ता. नायगांव येथील यादव नागोराव भद्रे वय वर्षे अंदाजे सुमारे 75 हे आपल्या कामानिमित्त नरसी येथे आले होते. ते नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या नरसीजवळ पायी जात असताना नांदेडकडून नरसीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या TN 52 J 8037 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने त्यांना ताटे यांच्या शेतासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात भद्रे हे गंभीर जखमी झाले.

हा अपघात घडताच घटनास्थळाजवळ उपस्थित असलेले मोटार वाहन परिवहन मंडळाचे निरीक्षक साळुंखे यासह खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, जनता हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर बैस, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सय्यद जाफर, पत्रकार अशोक जाधव, सय्यद खादर नरसीकर, नरसीचे पोलीस बीट जमादार सोनकांबळे, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून देण्याची व्यवस्था केले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी पाठवून देण्यात आले असून रामतीर्थ पोलिसांनी ट्रकसह चालकांना ताब्यात घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker