ताज्या बातम्यानांदेडबिलोली

विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे चार दिवसापासून चार गाव अंधारात नागरिक त्रस्त

मोरे मनोहर

किनाळा :- विज बिल थकीत असल्याच्या कारणावरून नरसी येथील विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चक्क चार गावचा चार दिवसापासून वीज पुरवठा खंडित केल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असताना चिटमोगरा तालुका बिलोली येथील सतीश नारायण चापोले यांचे अल्पशा आजार आहे. दि.7 मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास दुःखद निधन झाले असता त्यांचा दुसऱ्या दिवशी करावा लागणारा अंत्यविधी सायंकाळी कसलीही दिवाबतीची सोय नल्याने त्याच दिवशी अवघ्या काही तासातच अंत्यविधि करावा लागला असून गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे मयताच्या स्नानासाठी बाहेर गावाहून फिल्टरपाणी आणून मयतास स्नान घालावे लागले.

गावातील अनेक नागरिक वीज पुरवठा सुरळीतपणे भरलेला असताना म्हणतात ना गव्हासोबत किडे ही रगडले जातात याप्रमाणे नियमित विज बिल भरणा करणाऱ्यांचा ही विद्युत पुरवठा खंडित केल्याने अनेक नागरिकात विद्युत मंडळाच्या या भोंगळ कारभारांचा तीव्र संताप व्यक्त केल्या जात असुन नियमित बिल भरणा करणाऱ्यांचा तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत पने चालू करा अन्यथा वीज मंडळाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की बिलोली तालुक्यातील बिजूर, केरूर, चिटमोगरा आणि कामरसपली या चार गावातील नागरिकांचे विज बिल थकीत असल्याच्या कारणावरून नरसी येथील वीज मंडळाच्या अधिकाऱ्याने या चारही गावाचा मुख्य विद्युत पुरवठा दिनांक चार मार्च पासून बंद केलेला असल्याने गेल्या चार दिवसापासून चारही गावे अंधारात असून भर उन्हाळ्यात हा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याने गावात नियमित व सुरळीतपणे वीज पुरवठा केल्या तर अनेक नागरिक देखील मोठ्या प्रमाणात वीज बिल भरणा करू शकतात मात्र विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार असून अनेक वेळा गावातील वीजपुरवठा खंडित राहत असतो अशातच वीज ग्राहकांना येणारी वीज बिल आवाच्या सव्वा बिल दिली जात असल्याने अनेक ग्राहक हे वीज मंडळाच्या अशा या भोंगळ कारभाराला वैतागून गेले आहेत.

वीज वापराचे दर निश्चित असताना वापर युनिटपेक्षा कित्येक ग्राहकांना दुप्पट बिल आकारले जाते, कित्येक ग्राहकांना ग्राहकाने वापरलेल्या युनिट पेक्षा चार पट युनिट जास्त दिले जातात, 100 युनिट पेक्षा जास्त वापर दाखवून अधिकचा अधिभार ग्राहकावर टाकला जातो, ज्या ग्राहकांचे महिन्याला 30 ते 40 मिनिट वापर होऊ शकतो अशा ग्राहकांना जाणीवपूर्वक 100 युनिट पेक्षा जास्त युनिटघे बिल आकारून अनेक ग्राहकांना वेठीस धरल्या जाते या व अशा अनेक वीज मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य बीज ग्राहक मात्र वैतागले आहेत.

चार गावचा चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला असल्याने अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सायंकाळी घरात कोणीही झोपू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक नागरिक घराबाहेर झोपत असताना गाव रात्रीच्या वेळी काळोखात असल्याने याचा फायदा घेऊन गावात घर घरफोडी होईल या भीतीने अनेक नागरिकांना रात्रभर जागून काढण्याची वेळ आल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker