माधवराव पाटील शेळगावकर यांचा 22 रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यगौरव सोहळा

मोरे मनोहर
किनाळा :- राज्यातील जास्त समाजसेवक तथा महाराष्ट्र राज्य ग्रामस्वच्छता समितीचे सर्वप्रथम अध्यक्ष स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांचा कार्य गौरव सोहळा व माझी ग्रामविकासाची शेती या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी दिले.
पुरोगामी विचाराला मुठमाती देऊन ग्रामीण भागात विज्ञानवादी विचार सांगत संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेचा संदेश संपूर्ण राज्यात रुजवण्यासाठी स्वतःचे जन्मगाव स्वच्छ गाव सुंदर गाव शेळगाव ही ओळख निर्माण करून संपूर्ण राज्य हे हगणदारी मुक्त झाले पाहिजे ही भूमिका मनाशी बाळगून माधवराव पाटील शेळगावकर यांनी केलेल्या कार्याची नोंद घेउन त्यांचा हा कार्य गौरव सोहळा संपन्न होत असताना माधवराव पाटील शेळगावकर गौरव समितीचे राजेश देशमुख कुंटूरकर.

माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, दिलीपराव धर्माधिकारी,प्रा. प्रभाकर पवार, इंजि शिवाजीराजे पाटील बाभळीकर, संगमेश्वर लांडगे व प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांच्या पुढाकाराने माधवराव पाटील शेळगावकर यांच्या जिवनकार्यावर” माझी ग्रामविकासाची शेती : हे लिहिलेल्या आत्मचरित्राचे निर्मल प्रकाशनचे निर्मल कुमार सूर्यवंशी यांच्याकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या या सोहळ्यास दिग्गज मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळा माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या भव्य सोहळ्यासाठी राजाचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पद्मश्री पोपटराव पवार.
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार हेमंत भाऊ पाटील, प्रा, खासदार रवींद्र पाटील चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे, खा.नागेश पाटील आष्टीकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधवराव पाटील किनाळकर, माजी मंत्री डी पी सावंत, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार राजेश पवार आमदार, आमदार विक्रम काळे.
आमदार सतीश चव्हाण, आमदार तुषार राठोड, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार भीमराव केराम, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, हनमंत पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, शंकर अण्णा धोंडगे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, मल्लिनाथ कलशेट्टी, शिरीष पाटील गोरठेकर यासह राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त सरपंच चंदू पाटील मारवाड आधी सह अन्य मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
माधवराव पाटील शेळगावकर यांच्या या कार्य गौरव व माजी ग्रामविकासाची शेती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यास माधवराव पाटील शेळगावकर कुटुंबीयावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी केले आहे.



