ताज्या बातम्यानांदेडनायगांव

चिंचोली शिवारात उस्माननगर पोलीसांची कारवाई : अवैध वाळू उपसा करणारी दोन कोटीची यंत्रणा जप्त, सहा लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : चिंचोली शिवारातील भास्कर शिंदे यांच्या शेताजवळील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी पथकासह छापा कारवाई केली. गोदावरी नदीचे पात्रात सात लोखंडी बोट फायबर व सात छोटे इंजिन लोखंडी बोट मिळून आले. जवळपास 2 कोटी 10 लाखाची अवैध वाळू उपसा करणारी यंत्रणा जप्त केली असून सहा लोकांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

उस्माननगर येथील सपोनि संजय निलपत्रेवार नमुद पथकासह हदीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन गोपनीय माहीती मिळाली की, मौजे चिंचोली शिवारातील भास्कर शिंदे यांचे शेताजवळील गोदावरी नदीपात्रातुन बोट व फायबरच्या साहयाने विनापरवाना अवैधरित्या गौण खनिज रेतीसाठा करीत आहेत. सदर खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन नमुद पथकासह सदर ठिकाणी छापा कार्यवाही केली असता मौजे चिंचोली शिवारातील भास्कर शिंदे यांचे शेताजवळील गोदावरी नदीचे पात्रात सात लोखंडी बोट फायबर व सात छोटे इंजिन लोखंडी बोट मिळून आले बोटीवर रेती उपसा करणारे ईसम पोलीस पथकास पाहुन पळून गेले. अवैध वाळू उपसा करणारी 2 कोटी 10 लाखाची यंत्रणा जप्त केली.

त्यानंतर सपोनि संजय निलपत्रेवार यांनी ग्राम महसूल अधिकारी यांना संपर्क साधला असता लोखंडी बोटीच्या सहाय्याने रेती उपसा करण्यास कार्यालयातुन कोणालाही परवानगी दिलेली नाही बाबत माहिती मिळाली वरून सदरील रेती साठा अवैध रित्या उपसा करत आहेत अशी खात्री झाल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळावर बोलवून ग्राम महसुल अधिकारी मोतीराम पवार व लक्ष्मण गोधणे यांनी तसा रितसर पंचनामा पंचासमक्ष करुन दिल्याने वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर बोटी ग्राम महसूल अधिकारी यांनी जिलेटीनच्या सहाय्याने पंचा समक्ष जाग्यावरच नष्ट केलेल्या आहेत.

त्यानंतर बोट मालकांची माहिती घेवुन 1) उमेश गोविंदराव कांजाळकर, 2) गजानन साहेबराव खानसोळे, 3) नागेश रामराव लष्करे, 4) नारायण दत्ता कल्याणे, 5) बापुराव खोबराजी कल्याणे सर्व रा.वासरी ता.मुदखेड जि. नांदेड, 6) अवधुत बालाजी विठेवाड रा. शंखतिर्थ ता. मुदखेड जि. नांदेड यांचेविरूध्द पोलीस स्टेशन उस्माननगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker