तहसीलदारांनी वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन वाहणे पकडली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी थेट तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड या मैदानात उतरल्या असून. काल दि.2 रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान सोमठाणा कहाळा रोडवर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा पकडल्या असून. पुढील कारवाईसाठी कुंटूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड या काही दिवस सुट्टीवर गेल्या होत्या त्यामुळे नायगाव तहसीलदार पदाचा पदभार एका आय ए एस अधिकाऱ्यांना देण्यात आला होता पण त्यांनी पाट्या टाकण्याचे काम केले असल्याने वाळू माफीयांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. बरबडा परिसरातून वाहणाऱ्या गोदापात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता.
या सर्व गैरप्रकाराला कुंटूर पोलीसांचे पाठबळ असल्याचेही दिसून येत होते. कारण महसूल विभागाने कु़ंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास दहा पंधरा कारवाया केलेल्या आहेत पण येथील सहायक पोलिस निरीक्षकाने मात्र एकही कारवाई केली नाही हे विशेष. उलट वाळू माफीयांना मदत करण्याचेच धोरण आवलंबवले होते.
सुट्टीवरु रुजू झालेल्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी काल बुधवारी सायंकाळी कहाळा सोमठाणा रोडवर थांबल्या होत्या. तेवढ्यात एम एच ३०, ए बी ४६७६ या क्रमांकाचे टिप्पर येतांना दिसले. तहसीलदारांनी टिप्पर थांबवले. तेवढ्यात एम एच २१, बी एन ९४०४ या क्रमांकाचा हायवा आला या हायवाला थांबवण्यात आले.
दोन्ही वाहणाच्या चालकांना वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही अवैध वाळू असलेली वाहते जप्त करुन कुंटूर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी सचिन आरु, तलाठी मुधळे तलाठी देशमुख शासकीय वाहण चालक तुकाराम पुरी उपस्थित होते.



