ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला मात्र पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडीलांचा डोक्यात फरशी घालून खुन केल्याची धक्कादायक घटना दि. 2 एप्रिल रोजी उघडकीस आली. खुनाच्या घटनेनंतर नराधम मुलगा वडीलांचे प्रेत जागेवरच सोडून पळ काढला होता. मात्र नायगाव पोलिसांनी नांदेड शहरातून मुसक्या आवळल्या असून. सदर प्रकरणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नायगाव शहरात दारुड्या मुलाने चक्क आपल्या जन्मदात्याचा खुन केल्याची मानुसकीला काळीमा फासणारी व धक्कादायक घटना घडली आहे. नायगाव शहरात साईबाबा मंदिर परिसरात मारोती माणिक गटलावार (65) यांचे घर असून त्यांना नामदेव हा मुलगा आहे. मात्र मागच्या दोन वर्षांपासून नामदेवला दारुचे व्यसन लागले होते.

या व्यसनातून तो दररोज घरी आल्यानंतर पत्नी व वडिलांना शिविगाळ करुन मारहाण करत असे. नामदेव यास एक मुलगी आहे पण दररोजच्या शिविगाळ व मारहाणीच्या प्रकाराला पत्नीही कंटाळली होती ती बाळंतपणाला गेली मागच्या सहा सात महिण्यापासून आलीच नाही.

पत्नी घरी नसल्याने वडीलांचा व नामदेव याचा जेवनाचा प्रश्न गंभीर बनला होता. मुलगा दारुडा घरात अन्नाचा कण नाही अशा परिस्थितीत वडील मारोती यलगटवार हे शेजाऱ्याकडून मागून कशीबशी आपल्या पोटाची खळगी तर भरत होताच पण मुलाच्या रात्रीच्या जेवनाचीही व्यवस्था करुन ठेवायचा तरीही दारु पिऊन आल्यानंतर वडीलांना शिविगाळ करुन मारहाण करत असे.

काल दि. 1 एप्रिल रोजी रात्री उशिरा नामदेव दारुच्या नशेत घरी आल्यानंतर पुन्हा वडीलांना शिविगाळ करुन दारुच्या नशेत डोक्यावर फरशी घातली. त्यानंतर वडील जाग्यावरच कोसळले परंतु दारुच्या नशेत असलेल्या दिवट्याला याचे काहीही वाटले नाही. पहाटे दारु उतरल्यावर वडीलांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

पोलीस आपल्याला सोडणार नाहीत याची जाणीव झाल्यानंतर नराधम मुलगा वडीलांचा मृतदेह दारातच सोडून पहाटे घरातून पळ काढला होता. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मयत मारोती गटलावार यांचा मृतदेह उतरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करुन नराधम नामदेव गटलावार (35) याचा शोधाला सुरुवात केली तो नांदेड शहरात असल्याचे माहिती मिळाली. पोलिसांनी नांदेड शहरात खुनी मुलाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker