आमदाराची तक्रार, बांधकाम विभागाने २५ कोटी अडवले : बिल्डर्स असोसिएशन आक्रमक

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : आ.राजेश पवार यांनी पत्र दिल्यानंतर काही कंत्राटदाराचे देयके अडवण्यात आली त्यामुळे बिल्डर्स असोसिएशन आक्रमक झाली असून. एक निवेदन देवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधी वितरण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तब्बल २५ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांची थकबाकी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप निवेदनात केला असून. प्रशासनाकडे तात्काळ स्पष्टीकरणाची मागणी संघटनेच्या माध्यमातून कंत्राटदारांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संघटनेने दिलेल्या निवेदननुसार में.मोरे कन्स्ट्रक्शन, में.गामी डेव्हलपर्स आणि में.नुसरत कन्स्ट्रक्शनसह इतर काही कंत्राटदारांनी विविध विकासकामे नियमानुसार पारदर्शक प्रमाणे पूर्ण केली आहेत. संबंधित कामांची गुणवत्ता तपासणी तसेच तांत्रिक मान्यता देखील पूर्ण झालेली असतानाही, त्यांच्या बिलांची रक्कम दीर्घ काळापासून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, बिम्स -एम आय एस पोर्टलद्वारे निधीची तरतूद निश्चित करण्यात आलेली असतानाही प्रत्यक्ष वितरणात अनियमितता होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, काही विशिष्ट संस्थांना अन्यायकारक पद्धतीने प्राधान्य देऊन निधी वाटप करण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.विशेषतः
अडचणीच्या काळात कंत्राटदारांनी निधी उपलब्ध नसतानाही कामे पूर्ण केली असून, कोणतीही तक्रार न करता कामे वेळेत पूर्ण केली असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, निधी वितरणाच्या वेळी स्थानिक आमदार राजेश पवार ह्या लोकप्रतिनिधींच्या पत्रांवरून व प्रशासकीय हस्तक्षेपातून काही कंत्राटदारांना देयके दिली जात नसून त्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर, निधी नेमका कोणत्या संस्थांना, कोणत्या निकषांवर व किती प्रमाणात (टक्केवारीत) वितरित करण्यात आला याचे सविस्तर स्पष्टीकरण तात्काळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रलंबित देयके त्वरित अदा करून पारदर्शकता राखावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.सार्वजनिक
बांधकाम विभाग राजकीय दबावाखाली येवून कम करत असल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाने लवकरात लवकर भूमिका स्पष्ट केली नाही तर हा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



