ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड शहरात दोन गटात तुफान राडा ; तिघांचा मृत्यू, घटनेनंतर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : शहरात किरकोळ वाद होवून हाणामारी होण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या असताना आता टोळी युध्द सुरु झाले असून. रात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास कँनाल रोड परिसरात, डी मार्टच्या जवळ दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या रक्तरंजीत राड्यात तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सदरचा प्रकार टोळीयुद्धातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून. या घटनेनंतर नांदेड शहरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले असले तरी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

किरकोळ कारणांवरून वाद होणे, खुन्नस काढण्यासाठी चाकूने हल्ले करणे अशा प्रकारांमध्ये विशेषतः तरुणांचा सहभाग वाढताना दिसत आहे. अशातच नांदेड शहरात मध्यरात्री घडलेल्या एका हाणामारीच्या घटनेने संपूर्ण हादरून गेले आहे. नांदेड शहरातील कँनाल रोड परिसरात परिसरात शनिवारी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. जुन्या वैमनस्यातून वाद विकोपाला जाऊन तलवार व खंजीराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्जित सिंह चव्हाण, सय्यद अवेज आणि महम्मद अरबाज यांचा मृत्यू झाला.

टोळी युध्दातून तिघांचा बळी गेल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.प्रकरणी

परस्परांविरुद्ध दोन खुनांचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गटांतील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गॅंगवारमध्ये एका बाजूला साई गेहरवाल व त्याचे साथीदार, तर दुसऱ्या बाजूला अर्जित सिंह चव्हाण व त्याचे सहकारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker