ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

भरधाव टिप्पर गोदावरी नदीत पडला, एक जन ठार तर दुसरा जखमी : मुदखेड तालुक्यातील येळी माहटी फुलावरील घटना

प्रकाश महिपाळे

नांदेड : वाजेगाव हुन माळकौठा मार्ग माहटी येळी मारतळा जाताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने टिप्पर थेट गोदावरी नदी कोसळला. त्यात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर चालक बालंबाल बचावला असल्याची घटना दि. 4 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच महाटी येथील गुनवत जाधव, पद्माकर ढगे, संतोष ढगे, बळी पाटील, सरपंच अवधूत ढगे यांनी धाव घेवून टिप्परसह नदीमध्ये टिपर पडलेल्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र क्लिनरला वाचवता आले नाही. सध्या येळी माहटी हे अवैध्य वाळू उत्खनन काढण्यात तालुक्यात अग्रेसर असून या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे.गेल्या

आठवड्यात भरधाव वेगातील टिप्परने माळकौठा येथील एका युवकाचा बळी घेतल्याची घटना घडली होती. सध्या मुदखेड तालुक्यात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी शेकडो टिप्पर व हायवा बेसुमार वेगाने धावत आहेत. याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष झाल्यामुळे अशा घटना वारंवार रोज पाहण्यास मिळत आहे.

शनिवारी सकाळी गिट्टी घेवून जाणाऱ्या टिप्पर चालकाचा ताबा सुटल्यामुळे टिप्पर थेट गोदावरी पात्रात पडला. यात क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली तर दुसरा गंभीर जखमी झाला असल्याचं गावकरी सांगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker