शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी सेव्हिंग खात्याला लावलेले होल्ड तात्काळ काढावे- छावा संघटना

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांनचे हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या आसून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून पेरणी करतो आणि हाताला आलेला घास अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून त्यांच्या जखमेवर नमक टाकण्याच काम राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज थकीत झाले आहे असं सांगून शेतकऱ्यांनचे रोजच्या व्यवहाराचे सेव्हिंग खाते होल्ड करत आहे.

यामुळे तालुक्यातला शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे तरी होल्ड केलेले खाते लवकरात लवकर होल्ड काढून द्यावे अन्यथा बँकेसमोर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढणार यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी छावाचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक पाटील माहेगावकर व छावाचे तालुकाध्यक्ष साई पाटील मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



