कुंडलवाडी सोसायटी कडून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांची निवड
◆विशेष सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

कुंडलवाडी :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची विशेष सर्वसाधारण सभा दि.१० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात चेअरमन सुनिल बेजगमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या विशेष सभेत सोसायटी कडून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७६ (१) अन्वये चेअरमन सुनिल रमाकांत बेजगमवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती.विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात यावी यासाठी संस्थेच्या ३७८ सभासदांनी चेअरमन यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली होती.
या विशेष सभेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड या संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षा करीता संचालक मंडळाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार, मतदार, सूचक व अनुमोदक होणेसाठी प्रतिनिधीस अधिकार देणे बाबत चा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यात सोसायटी चे सभासद डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार यांची निवड करण्यात आली. यावेळी व्हाँईस चेअरमन गंगाधर नरावाड यांच्यासह संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष सर्वसाधारण सभेत मँनेजर म्हणून नागनाथ खेळगे यांनी काम पाहिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
कुंडलवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांची सोसायटी कडून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.



