राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महात्मा ज्योतीराव फुले यांना अभिवादन

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :-स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाची दारे उघडण्यासाठी फुले दांपत्याने केलेले कार्य हे पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला खालील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती: भगवानराव पाटील आलेगांवकर (नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष), सौ. प्रांजलीताई रावनगांवकर (जिल्हाध्यक्षा, महिला आघाडी ग्रामीण), लक्ष्मणराव भवरे (मा. प्रदेश प्रतिनिधी, राष्ट्रवादी किसान सभा), नाना पोहरे (संचालक, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती), शिवकुमार देवकते (ग्रामीण जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल), शफी उर रहेमान (शहर जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक सेल), मारोती चिवळीकर (शहर जिल्हाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग)
यासोबतच बालासाहेब मादसवाड, सुभाष रावणगांवकर, रंगनाथ वाघ, तरविंदसिंघ बडगुजर, मंगल साखरे, पुनम सरदार, पदवीधर सेलचे डॉ. उत्तम मोरे, माणिक बोडके आणि यशवंत कांबळे यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



