क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुलतीने केला शेत जमिनीच्या वादातून सात वर्षाच्या बालकाचा खून

New Bharat Times नेटवर्क

चाकूर : तालुक्यातील जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातून दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि.19 सकाळी घडली, पोलिसांना दुपारी यापैकी एका बालकाचा मृतदेह घराच्या शेजारीच आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत चुलतीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तीने शेतजमिनच्या वादातून पुतण्याचा खून केल्याचे निष्पन्न झाल्या वरून तिच्या विरुद्ध रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महादेव मंदीराचे पुजारी चंद्रकांत स्वामी यांचे साईचरण दिनेश स्वामी (वय १० ) व देवांश मंगेश स्वामी (वय ७) ही दोन्ही नातवंडे रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेले होते, घरातील व्यक्तींनी त्यांचा सर्वत्र शोध घेवून सापडले नसल्यामुळे त्यांनी दुपारी एक वाजता ही बाब पोलिसांनी सांगितली. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, दुपारी सुमारे २.१० वाजता बेपत्ता मुलांपैकी देवांश स्वामी याचा मृतदेह चाकूर – उजळंब रोडलगत जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहहाचे चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली साईचरण स्वामी हा मुलगा रात्री उशीरा लातूर येथे सापडून आला. या प्रकरणाचा तपास फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाच्या मदतीने विविध अंगांनी तपास करण्यात आला.

देवांश मंगेश स्वामी (वय ७) या मुलाचा चुलती अनिता दिनेश स्वामी (वय ३४, रा. जुने महादेव मंदिर जवळ, चाकूर) हिने शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपीने मुलाचा गळा दाबून खून करून मृतदेह लपवून ठेवण्याचा तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय कोणावरही संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलाच्या बेपत्ता असल्याचा बनाव केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. याबाबत मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक बालाजी भंडे हे करित आहेत.

पोलिस अधिक्षक आठ तास चाकूर पोलिस ठाण्यात तळ ठोकून पोलिसांना सात वर्षीय देवांशचा मृतदेह सापडताच पोलिस अधिक्षक अमोल तांबे व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते. श्वान पथकाने सुगावा देताच चुलती अनिता हीस दोन तासात पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला ती कबुल होत नव्हती. पोलिसांनी रात्री उशिरा पर्यंत अनेक नातेवाईकाची चौकशी केली व अनितास अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker