ताज्या बातम्यानांदेडनायगांव

घुंगराळा येथे भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी संघरत्न ढवळे, तर सचिवपदी सचिन गजभारे यांची निवड

नायगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने, नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे ‘सार्वजनिक भीम जयंती मंडळा’च्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संघरत्न बबन ढवळे तर सचिवपदी सचिन रमेश गजभारे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

​१९ एप्रिल रोजी गावातील उरूवेला बुद्ध विहार येथे सेवानिवृत्त एस. के. गजभारे साहेब आणि वंचित बहुजन युवा आघाडी (नांदेड दक्षिण) चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माधवराव गजभारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन करून नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

​यावेळी सर्वानुमते निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी आहे:

पदनाव
अध्यक्षसंघरत्न बबन ढवळे
सचिवसचिन रमेश गजभारे
उपाध्यक्षसिद्धांत अशोक पट्टेकर
कोषाध्यक्षमाधव अमृता गजभारे
सहकोषाध्यक्षपुंडलिक निवृत्ती आढाव
सल्लागारप्रभता शंकरराव हाणमंते
व्यवस्थापकउत्तम काशीराम गजभारे, अच्युत हरीभाऊ सोनसळे, सुनील संभाजी हानवटे, साहेबराव माधव गजभारे

​डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही घुंगराळ्यात विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या बैठकीत २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

​या बैठकीला एस. के. गजभारे, गणपत गजभारे, प्रकाश गजभारे, निवृत्ती आढाव, दीपक गजभारे (वंचित जिल्हा उपाध्यक्ष), अमित बोंडले, विलास बोंडले, योगेश तुरटवाड, कुणाल गजभारे, धम्मपाल ढवळे, नागेश गजभारे, श्री. सोनसळे, महेश गजभारे, हर्ष सोनसळे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker