ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा!

• चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्य पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

नांदेड, दि. 29: राज्यातील 304 तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा, चारा बियाणे, चारा ठोंबे, वैद्यकीय उपचार तसेच इतर आवश्यक सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अद्ययावत करावी, तसेच नवीन पशुधनाचे टॅगिंग करून त्याची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, मदतकार्य व सवलतींचा लाभ पारदर्शकपणे आणि थेट पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी असणे आवश्यक आहे. यासाठी पशुपालकांनी आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून पशुधनाची अचूक नोंदणी करून घ्यावी. तसेच नवीन पशुधनाच्या कानात 12 अंकी ओळख क्रमांकाचा बिल्ला (टॅग) बसवून त्याची नोंद प्रणालीवर करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन व संवर्धन ही पशुसंवर्धन विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी व टॅगिंग ‘भारत पशुधन’ प्रणालीवर करून घ्यावे. या डिजिटल नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत चारा बियाणे, चारा ठोंबे व इतर आवश्यक मदत पात्र पशुपालकांपर्यंत अचूकपणे पोहोचविणे शक्य होईल. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker