ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ; महसूल सेवा आपल्या दारी, लोकाभिमुख प्रशासनाची भरारी

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- तालुक्यातील प्रशासकीय सेवा अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी बिलोली महसूल मंडळ अधिकारी कार्यालय व सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. शिबिराचा पहिला टप्पा दि ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे पार पडणार आहे. तरी या शिबीराचे शेकरी, ग्रामस्थ व विध्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे महसूल विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील ६ मंडळाधिकारी कार्यालय व सर्व ग्राम महसूल विभागाच्या वतीने लोकाभिमुख प्रशासन व महसूल सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहचण्याच्या उद्धेशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर ७ ते १५ मे पर्यंत आयोजित करण्यात आहे. दि. ७ मार्च रोजी सगरोळी, १४ मार्च रामतीर्थ, १० एप्रिल आदमपूर, १७ एप्रिल लोहगाव, ८ मे बिलोली मंडळ व नगर परिषद, १५ मे रोजी कुंडलवाडी मंडळ व नगर परिषद अशा सहा महसूल मंडळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

यात तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तक्रारीचे निवारण आणि दैनंदिन महसूली विषय व डिजिटल सेवा, डिजिटल ७/१२, ८ अ आणि प्रलंबित प्रकरणे शंभर टक्के निकाली काढणे. तसेच शिबिर स्थळी मिळणाऱ्या १५ प्रमुख सेवा पुढील प्रमाणे
७/१२ वाचन ‘जिवंत ७/१२ मोहीम’ अंतर्गत प्रत्यक्ष वाचन, सामाजिक योजना, विविध अर्थसहाय्य योजनांचे अर्ज स्वीकारणे, त्रुटी दुरुस्ती: ७/१२ मधील तांत्रिक त्रुटींबाबत अर्ज स्वीकारणे, विद्यार्थी सुविधा, शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक सर्व दाखल्यांचे अर्ज, डिजिटल जनजागृती, डिजिटल ७/१२ च्या कायदेशीर वैधतेबाबत मार्गदर्शन.

७ / १२ उतारा वाटप, मंजूर फेरफार, ७/१२ व ८ अ खाते उतारा वाटप, जमीन रुपांतरण, भोगवटदार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करणे, तुकडेबंदी नियमितीकरण, व दि.१५/११/१९६५ ते १५/११/२०२४ पर्यंतचे कमी क्षेत्राचे खरेदी-विक्री व्यवहार नियमानुकूल करणे, अकृषक (एनए) मार्गदर्शन, अकृषक तरतुदींमधील सुधारणांबाबत सल्ला, ऑनलाईन सेवा, आवश्यक कागदपत्रांसह विविध ऑनलाईन अर्जांची स्वीकृती, अग्रीस्टेक आणि पी.एम.किसान नोंदणीसह अशा विविध प्रशासकीय सेवा अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

यामुळे नागरिकांची वरील कामासाठी होणारी फरपट काही प्रमाणात थांबेल. म्हणून दिलासादायक शिबीरास सगरोळी मंडळासह तालुक्यातील सहा मंडळाच्या सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, तालुका भूमी अभिलेख कार्यालय व वन विभाग व आपल्या महसूल विषयक समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सगरोळी मंडळाधिकारी व बिलोली महसूल विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker