डॉ.शंकरराव चव्हाण यांचे काँग्रेस व नांदेडसाठी मोठे योगदान – खा.रवींद्र चव्हाण

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :– माजी केंद्रीय गृहमंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेससाठी तसेच नांदेडच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचे कार्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन खा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केले. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठवाड्याचे भाग्यविधाते जलप्रणेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्हा युवक काँग्रेस आयोजित महारक्तदान शिबिरात खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, नांदेड महानगर पालिका निवडणुकीत युवकांना संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार, एकनाथराव मोरे, माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, तिरूपती पाटील कोंढेकर, माजी महापौर जयश्री पावडे, श्याम दरक, राजेश पावडे, विठ्ठल पावडे, सतीश देशमुख तरोडेकर, बालाजी चव्हाण, प्रफुल्ल सावंत, महिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रेखाताई चव्हाण, जसिकाताई शिंदे, गंगाधर सोंडारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनने उपस्थित होते. रक्तदान शिबिरात असंख्य युवकांनी रक्तदान करून या शिबिराला प्रचंड प्रतिसाद दिला.



