पानचिंचोलीत महिलेवर अत्याचार : आरोपीस निलंगा पोलिसांनी केली अटक

New Bharat Times नेटवर्क
निलंगा : तालुक्यातील पानचिंचोली येथे घरात काम करत असलेल्या ५२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणास निलंगा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवार, दि. २२ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पानचिंचोली येथील पीडित महिला घरात काम करत असताना त्याच गावातील प्रवीण बंकट जाधव (वय २५) याने घरात घुसून महिलेचे हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवली. आरोपी प्रवीण जाधव याच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



