ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगावात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा दणका…1 कोटी 60 हजारांचा मुद्देमाल जप्ततीत टिप्पर, 12 ब्रास रेती जप्त : ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत कारवाई

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत नायगाव पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1,00,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दि. 19/05/2026 रोजी पहाटे 01.54 वाजता मांजरम बसस्थानकाजवळ गडगा ते कडाळा रोडवर सपोनि सोपान वळगे, पो.कॉ. नारायण नंदेवार व पो.कॉ. ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कोलंबी कडून येणारे तीन टिप्पर अवैध रेती वाहतूक करताना आढळले. चालकांकडे परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता कोणतेही कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिन्ही टिप्पर रेतीसह जप्त करून नायगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

जप्त मुद्देमाल

  1. MH-04-एच.वाय-6481 : टाटा टिप्पर किंमत 20 लाख + 2 ब्रास वाळू 10 हजार
  2. MH-46-ए.एफ-3200 : भारत बेंझ टिप्पर किंमत 40 लाख + 5 ब्रास वाळू 25 हजार
  3. MH-03-सी.पी.-7224 : भारत बेंझ दहा टायरी टिप्पर किंमत 40 लाख + 5 ब्रास वाळू 25 हजार
    एकूण : 1 कोटी 60 हजार रुपयांचा मुद्देमाल

अटक आरोपी

  1. प्रताप पंडितराव मोरे, वय 32, रा. टाकळी बु. ता. नायगाव
  2. योगेश बळीराम दापरवाड, वय 20, रा. मारतळा ता. लोहा
  3. अक्षय रावसाहेब बत्रे, वय 22, रा. हातनूर ता. लोहा

गुन्हा दाखल : गु.र.नं. 121/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल. तपास स.पो.नि. नरसिंग पोमनाळकर करत आहेत.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पो.नि. शशांत एन.एम. यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker