ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जिगळा येथे २६ रोजी भीमशाहीर साहेबराव येरेकर यांचा भिम – बुद्ध गीतांचा कार्यक्रम

मोरे मनोहर

किनाळा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिगळा नं.२ तालुका बिलोली येथे दि 25 व 26 एप्रिल रोजी दोन दिवस दोन सत्रात भीम महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 25 रोजी पहिल्या सत्रात जयंतीचा तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 26 रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहीर साहेबराव येरेकर यांचा भीम बुद्ध गीतांचा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे.

शंकरनगर जवळ असलेल्या जिगळा नं.2 येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, पहिल्या सत्रात 25 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण नांदेड लोकसभेचे खा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते तर निळा ध्वजारोहण बिलोली येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते आणी लाल ध्वजारोहण आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी चार वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात 26 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भास्कर भगवान पाटील भिलवंडे हे तर उद्घाटक म्हणून मनपा वाघाळा महानगरपालिका नांदेड गटनेते प्रशांत इंगोले हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब पाटील जिगळेकर, प्रताप पाटील जिगळेकर, मधुकर पिसाळे हे उपस्थित राहणार आहेत.

तर प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण ठक्करवाड, संजय बेळगे, रवी पाटील खतगावकर, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, नागनाथ लोखंडे, अनिल शिरसे, संदीप कटारे, सम्रत पाटील पाटील कानोले, विठ्ठल बेडगे, माधव गजभारे, विश्वंभर कांबळे, दिलीप पाटील पांढरे, शंकर पाटील कानोले, आनंद पाटील सुपारे, कैलास तेलंग, परबत पाटील येरडे, सुभाष पाटील कानडे, हनमंत पाटील कानोले, राजेश कांबळे, व्यंकट पाटील कानोले हे उपस्थित राहणार आहेत .

यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीम शाहीर साहेबराव येरेकर यांच्या भीम बुद्ध गीतांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर महोत्सव कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आव्हान जिगळा नंबर दोन येतील जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker