ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

चौथ्या बौद्ध विवाह मेळावा समिती अध्यक्षपदी अशोकराव येरेकर तर सचिवपदी मादळे

नांदेड शहरात 5 जून रोजी संपन्न होणार भव्य बौद्ध विवाह मेळावा

जयवर्धन भोसीकर

नांदेड – शहरात गेल्या तीन वर्षांपासून बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन सामाजातिल सामान्य लोकांच्या वतीने आयोजित केला जाते. याही वर्षी शुक्रवारी 5 जून -2026 रोजी दुपारी 12.25 वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय डी-मार्ट रोड, नांदेड येथे चौथ्या बौद्ध विवाह मेळावा आयोजित केला असून या मेळावा समितीच्या अध्यक्षपदी अभियंता अशोकराव येरेकर तर सचिवपदी आर. बि. मादळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक अभियंता भरतकुमार कानिंदे व अभियंता भिमराव धनजकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

इतर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष भगवानराव धबडगे, सहसचिव यशवंतराव उबारे, निमंत्रक अभियंता प्रशांत ठमके, पुरुष समीतीमध्ये सदस्य अभियंता वसंत वीर, अभियंता यशवंत गच्चे, अभियंता डी.डी.भालेराव, अभियंता दिपक बनसोडे,चंद्रमुणि भरणे,प्रा.टी.पी.वाघमारे, देविदास भिसे, आर.सी.कांबळे,अनिल कावळे, अभियंता संघरत्न सोनसळे, अभियंता प्रकाश प्रा.राजाराम वाघमारे , नगारे, प्रा.सुरेश, मोरे, प्रा.तूकाराम सर्पे, अभियंता एस.टि.पंडित, रतन येडके, ईश्वर सावंत, अभियंता अशोकराव गायकवाड, संघरत्न निवडंगे, जयभीम पाटील, नितीन एंगडे, कोंडीबा वासाटे, संजराव वाघमारे, गोपाळ गायकवाड, निशांत सोने, गुणवंत भगत, माधव आठवले, विजय रावळे, प्रेमदास घुले, राजेश बिऱ्हाडे, सम्राट आढाव,संजय भगत, प्रसिद्धीप्रमुख पत्रकार अविनाश पाटील, पत्रकार भैय्यासाहेब गोडबोले, सदाशिव गच्चे, शुभम सोनाळे यांची निवड करण्यात आली आहे.

महीला समितीमध्ये क्रांती प्रधान, रमाबाई पाटील, सुनीता कानिंदे,जयाताई सुर्यवंशी, जनाबाई पोपलवार,प्रतिमा भगत, कुसूम धोटे, पुष्पा भरणे, निर्मला नरवाडे, दिक्षा नांगरे, जयश्री भगत, शैलजा लोणे, वनिता उमरे, शांताबाई धुताडे, गयाबाई कोकरे, कल्पना काटकांबळे, डॉ.स्वाती सरोदे, डॉ.प्रेरना ढवळे, सुनीता वासाटे, बबीता पोटफोडे, संगीता सवई, माया पाटील, मीनाक्षी रोने, सुजाता शिरसे, सुरेखा मवाडे, मनिषा भालेराव, अनुजा अभंगे, सुमनबाई सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

वधु-वर नोंदणी प्रमुख गणपतराव गायकवाड, सा.ना.भालेराव, विजय रावळे, साहेबराव पुंडगे, भास्कर भगत,रवि चिखलीकर, राहुल कोकरे, तुळशीराम पाटील, वैशाली सोनसळे, कोषाध्यक्ष गौतम कांबळे निमंत्रक अभियंता प्रशांत ठमके यांची निवड करण्यात आली असून या बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त पालकांनी आपल्या लग्न जुळलेल्या वधू-वरांची नावे समितीकडे नोंदवून या मोफत पार पडणाऱ्या बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक अभियंता भरतकुमार कानिंदे आणि अभियंता भिमराव धनजकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker