ताज्या बातम्यानांदेडनायगांव

घुंगराळा येथील पाझर तलावातून गाळ काढण्याच्या नावाखाली मुरुमाचे उत्खनन : महसूल विभाग बघ्याच्या भुमिकेत

प्रकाश महिपाळे

नायगाव : तालुक्यातील घुंगराळा येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क मुरुमाचे अवैध उत्खनन होत आहे. शेकडो ब्रास मुरुमाचे दिवसरात्र अवैधरित्या उत्खनन होत असतांना महसूल विभाग बघ्याची भुमिका घेत आहे. महसूल विभागाच्या संशयास्पद भुमिकेमुळे हे सर्व मुरुम माफीयांच्या आर्थिक ओझ्याखाली दबले नाहीत ना अशी चर्चा नागरिक करत आहेत.

सध्या नायगाव तालुका माती व मुरुम माफीयांना आंदन दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तहसीलदार आठवड्यातून तीन दिवस गायब असतात तर महसूलचे अनेक तलाठी व मंडळ अधिकारी हे नांदेडला असतात त्यामुळे माफीयांनी प्रचंड उच्छाद मांडला आहे. तलाठ्यापासून ते तहसीलदारापर्यत प्रत्येकजन फक्त मोदक किती आणि कुठे मिळतात याकडेच लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे नायगाव तालुक्यात अभुतपुर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून तहसील कार्यालयात कुणाचा पायपोस कुणाला राहीला नाही.

मागील तीन चार दिवसापासून घुंगराळा येथील पाझर तलावात गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क शेकडो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात येत आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली मुरुमाचे अवैध उत्खनन होत असताना तलवार व मंडळ अधिकारी बघ्याची भुमिका घेत आहेत त्यामुळे अनेकांनी थेट तहसीलदारांना फोन करुन माहिती दिली असता बघते, माणूस पाठवते, कारवाई करते एवढेच उत्तर मिळाले. पण या प्रकरणी कुठलीच कारवाई झाली नाही.

अवैध मुरुम उत्खनन प्रकरणाची तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारही दखल घेत नसल्याने या मुरूम माफीयाच्या अर्थिक ओझ्याखाली अधिकारी दबले नाहीत ना अशी चर्चा घुंगराळा येथील नागरिक करत आहेत. नायगाव तालुक्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता महसूल विभागाला एका सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker