ताज्या बातम्यानांदेडनायगांव

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप


​नायगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन हृदयसम्राट ऍड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात ‘स्वाभिमानी दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याच औचित्याने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे आणि पाणी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.



​ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयातील प्रत्येक कक्षात जाऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली आणि त्यांना फळे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.



​या सामाजिक उपक्रमावेळी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने: भगवान हणमंते आंचोलीकर (जिल्हा सल्लागार, वंअआ नांदेड दक्षिण), दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर (जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), अनिल गायकांबळे सर (तालुकाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा)
​साहेबराव कोपरेकर (माजी तालुकाध्यक्ष)
​यांच्यासह सतिश वाघमारे, प्रभाकर घंटेवाड, विलास वाघमारे, गौतम धडेकर, गौतम हणमंते, संतोष भालेराव, विनोद भालेराव, गुरुनाथ गायकवाड, साईनाथ नामवाडे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

​या उपक्रमात नायगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे सर, डॉ. बनसोडे सर, स्वामी सिस्टर, भिमराव डूमणे, कदम मामा, गंगोत्री मामा, पाळेकर मामा आणि शहापुरे गार्ड यांच्यासह परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. नेत्याचा वाढदिवस हार-तुरे किंवा केक कापून साजरा न करता, गरजू रुग्णांना मदत करून साजरा केल्याबद्दल परिसरातून वंचित बहुजन आघाडीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker