ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेडमध्ये ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा ७२ वा वाढदिवस ‘स्वाभिमान दिवस’ म्हणून उत्साहात साजरा ; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


​नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेडच्या वतीने आज १० मे रोजी ‘स्वाभिमान दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे वाटप आणि नामफलक अनावरण अशा विविध सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण जिल्हा परिसर निनादला होता.



​सकाळी ठीक ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महात्मा फुले पुतळा परिसरात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी स्वतः रक्तदान करून केले.

याच कार्यक्रमात समता सैनिक दलात कार्यरत असलेल्या दीक्षा गजभारे हिचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, तरोडा नाका येथे वंचित बहुजन आघाडीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यासोबतच शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

​या सर्व उपक्रमांसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य ॲड.अविनाश भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात
​नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, नांदेड दक्षिणचे जिल्हा महासचिव रविभाऊ पंडित तुप्पेकर, नांदेड उत्तरचे जिल्हा महासचिव दीपक मगर, जिल्हा सचिव अजय (बंटी) गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष के. एच. वने, पंढरीनाथ अहंकारे.

जिल्हा संघटक संजय टिके, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, रामराव ढवळे, धाराजी हिंगोली, ॲड. जयपाल ढवळे, डॉ. गोरखनाथ पाटील, विनोद कुमार वाघमारे, बालाजी सूर्यतळे, बालाजी सावंत, दीपक कसबे, उत्तम वाढवे, गौतम सावते, गणपत सवयी सोनकांबळे, विद्यानंद पोवळे, प्रल्हाद इंगोले, विनायक गजभारे, डॉ. रामचंद्र वनंजे आणि धम्मा एंगडे यांचा समावेश होता. यासोबतच नांदेड दक्षिण व उत्तर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​येत्या १९ मे, मंगळवार रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर, नवीन नांदेड (कवठा) या ठिकाणी देखील वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker