ताज्या बातम्यानांदेडहिमायत नगर

सवना-पार्डी रस्ता निकृष्ट कामात कंत्राटदाराला जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याकडून अभय !.

शिवसेना (उबाठा ) आक्रमक ; युवतीसेनेच्या जिल्हा समन्वयिका आज रस्त्यालगतच उपोषणास बसणार !

New Bharat Times नेटवर्क

हिमायतनगर :- हिमायतनगर तालुक्यातील सवना – पार्डी या रस्ता निकृष्ट कामात संबंधित नक्षत्र कंस्ट्रक्शनला नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी अभय दिल्याने या कामाच्या चौकशीसह दोषींविरुद्ध कारवाईसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक बनला असून शिवसेना युवतीसेनेच्या जिल्हा समन्वयिका प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी सदरील रस्त्यालगतच दि.१९ मे पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा निवेदनातून दिला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सवना-पार्डी रस्त्याचे काम नक्षत्र कंस्ट्रक्शन यांनी घेतलेले असून या रस्त्याचे डांबरीकरण केलेले असतांनाही डांबरीकरण व सिमेंट क्रांकीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. त्यात कार्यकारी अभियंता यांनी अनियमितपणा दाखवून संबंधित कंत्राटदाराला सदरील काम पूर्ण होण्याअगोदरच त्यासाठीचे मंजूर असलेले तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचे देयके अदा केलेले असल्याने याबाबत वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशीसह संबंधित नक्षत्र कंस्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकावे.

त्यांचेसह त्यांना डोळेझाकपणातून या कामाची देयके दिलेल्या कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.१३ मे रोजी शिवसेना युवतीसेना जिल्हा समन्वयिका व सरसम (बु.) च्या ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी केली व जिल्हा परिषदेच्या भोकर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही या निवेदनाच्या प्रती दिल्या.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यापूर्वी या प्रकरणात निवेदन दिल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाहीऐवजी संबंधित दोषी कंत्राटदार व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाठीशी घालीत आहेत.त्यामूळेच या प्रकरणात योग्यतेने चौकशीसह दोषींविरुद्ध कारवाईसाठी सवना-पार्डी या रस्त्याच्या कडेलाच दि.१९ मे पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker