काहाळा येथील गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई तर शहरात मात्र खुलेआम विक्री स्थानिक पोलिसांकडून मौन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- तालुक्यात काही दिवसांपूर्वी कुटुंर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहाळा येथील खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्या माफिया वर आय.जी चया पथकाने धाड टाकत मोठी कारवाई करण्यात आल्याने आजुबाजूच्या परिसरात मात्र गुटखा माफियाचे धाबे चांगलेच दणाणले होते मात्र नायगाव शहरात मात्र या कारवाईने आमच काही होत नाही अशी भूमिका दाखवत आहेत या सर्व पानटपरी वरील गुटखा खुले आम विक्री केला जातो या कडे स्थानिक पोलीस प्रशासन दुपटी भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात जागोजागी गुटखा विक्री मोठ्या थाटात विक्री केली जाते शहरातील नांदेड जाणारया गाड्या बस स्टँड परिसरात गुटख्यासह पानटपरी टुकार पोरांची टोळी नेहमी कॉलेज ला जाणारे मुली महिला कर्मचारी वर्ग ते जा करतात तिथेच टुकार पोरांची टोळीला हे पाणटपरी वाले बैठक ठेवली जाते मोठ्या प्रमाणात गुटखा सिगारेट रस्त्यावर टुकार पणा करत असता गुटखा खाऊन घानिचे साम्राज्य निर्माण करतात मात्र पोलिसांकडून मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात येते.
शहरात दोन ते तिन डिलर शिप द्वारे शहरात गुटखा विक्री केली जाते मोटारसायकल वर विक्री करत डिलर शिप जागो जागी पानटपरीवर जाऊन गुटखा विक्री केली जाते. महाराष्ट्रात गुटखा बंदीला 12 वर्ष झाली. पण नायगाव शहरात गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू प्रत्येक चौकात, प्रत्येक पानटपरीवर, किराणा दुकानात ‘कुरकुरे-बिस्कीट’सारखा विकला जातोय. शाळकरी पोरांच्या दप्तरात वह्या कमी आणि गुटख्याच्या पुड्या जास्त सापडतात.
गुटखा विक्री सह पार्सल चे प्रमाण मोठ्या प्रमाणात तालुक्यात वाढत चालले आहे येतो कुठून की आणला जातो व प्रत्येक पान टपरीवर पार्सल केल्या जातो काही नी तर नांदेडवरून मोटार सायकल वरून आणून विकत असतात गुटखा चे मोठे डिलर पण तालुक्यात दुकान मांडून बसले आहेत काही वेळेला हे स्पष्ट सांगत असतात आम्ही देऊन घेऊन चालवतोत असे बोलल्या जाते यात पोलीसच रक्षकाची भुमिका घेत नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे मात्र तालुक्यात चित्र वेगळयाच पाहायला मिळत आहे रक्षकच झाले भक्षक का ?
तालुक्या सह शहरात खुलेआम चालणाऱ्या गुटखा विक्री वर स्थानिक पोलीस कारवाई करणार की कारवाई च्या नावाखाली रान मोकळे सोडले जाणार असल्याचे बोलण्यात येत आहे. प्रत्येक पान टपरीवर मात्र चढ्या भावाने मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते काहाळा येथील कारवाई चे नाव सांगत चढ्या भावाने विक्री केली जाते आता स्थानिक पोलीस प्रशासन ना करते पणामुळे यावर वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार या कडे सर्वाचे लक्ष लागून आहे.



