कै.बळवंतराव चव्हाण यांना अनेक मान्यवराकडून आदरांजली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : साधी राहणी उच्च विचार आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले कै. माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांचे सोमवारी १९ वे पुण्यस्मरण. या निमित्त चव्हाण परिवारासह अनेक मान्यवरांनी समाधीस्थळी जावून आदरांजली वाहीली.

कर्मयोगी बळवंतराव चव्हाण नायगाव चे भूमिपुत्र असले तरीही त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आणि कार्यामुळे महाराष्ट्रभर अजरामर झाले. कै. बळवंतराव चव्हाण यांचा जन्म नायगाव सारख्या छोट्या खेडेगावात झाला असला तरी राजकारणात त्यांनी बरेच चढ उतार पाहीले होते. त्यांचा गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना उभारणीत मोठे योगदान होते. अशा व्यक्तीमत्वाच्या निधनाला ला दि.७ आँगष्ट रोजी १९ वर्ष झाले. त्यामुळे हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी श्रध्दांजलीचे आयोजन करण्यात आले होते.
पंकज चव्हाण, श्रीकांत चव्हाण, अजित चव्हाण, सुमित चव्हाण, विराज चव्हाण आणि सार्थक चव्हाण यांच्या हस्ते समाधी स्थळाचे पूजन करण्यात आले. केशवराव पाटील चव्हाण, हनुमंतराव पाटील चव्हाण, सुधाकर पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, धनंजय पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण, डॉ.विश्वास पा.चव्हाण यांच्यासह चव्हाण परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी माधवराव बेळगे, बळवंतराव पाटी बेटमोगरेकर, माजी प्राचार्य गोविंद मेथे, पंडीत पाटील खैरगावकर, बि.आर.कदम, प्रा.बलभीम वाघमारे, माजी प्राचार्य के.जी.सुर्यवंशी, माजी प्राचार्य बाळासाहेब इंगळे, माजी प्राचार्य के. हरिबाबू,माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, विठ्ठल पावडे, कैलास कह्राळे,आत्माराम चव्हाण, प्रल्हाद पाटील इज्जतगावकर, गोविंदराव शिंदे, वसंतराव खैरगावकर, बेळगे सर, अशोक पाटील सोमठाणकर, यादव पाटील शिंदे, माजी नगरसेवक रमेश शिंदे, संजय चव्हाण, माणिक चव्हाण, अविनाश अंजणीकर, जाध् सर, शिवराज वरवटे, दत्ता पाटील इज्जतगावकर, प्रल्हाद पाटील होटाळकर, मधूकर ताटे, भगवान पा. लंगडापुरे, बालाजी बेटमोगरेकर, माधव कुलकर्णी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते


