डॉ.मीनलताई निरंजन पाटील खतगावकर यांच्याकडून वाघमारे कुटुंबीयांचे सांत्वन

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : नरसी येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या मातोश्री पार्वतीबाई माधवराव वाघमारे यांचे गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा डॉ.मीनलताई निरंजन पाटील पाटील खतगावकर यांनी नरसी येथील वाघमारे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी वाघमारे कुटुंबीयांशी आस्थेने संवाद साधत त्यांना धीर दिला.
स्व.पार्वतीबाई वाघमारे यांना २६ सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर लातूर येथील श्री साई हॉस्पिटलमध्ये त्यांनी तब्बल पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, उपचार सुरू असतानाही त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. अखेर ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांनी नरसी येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वाघमारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद प्रसंगी डॉ.मीनलताई निरंजन पाटील खतगावकर यांनी वाघमारे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वनपर भावना व्यक्त केल्या. आईच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसली, तरी अशा कठीण प्रसंगी आपुलकीने विचारपूस करून धीर देणाऱ्या व्यक्तींच्या भेटीमुळे दुःखाचा भार निश्चित हलका झाल्याची भावना वाघमारे कुंटुंबियांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर भिलवंडे, ज्येष्ठ नेते राजू गंदीगुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नंदकिशोर रातोळीकर, सदाशिव पाटील डाकोरे, नंदकिशोर नरसीकर, गजानन भोसले, मारोती भोसले, प्रमोद वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, डॉ. प्रा.अशोक वाघमारे, राजू वाघमारे, अतिष वाघमारे, राजेश कामखंडे, भीमराव वाघमारे, नागेश भेदे आदी उपस्थित होते.



