ताज्या बातम्यानांदेडलोहा

हाळदा ग्रामपंचायतला बालीका पंचायत मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे सन्मानित

बालासाहेब शिंदे

मारतळा :- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे. या उपक्रमाला सुरूवात केल्यानंतर बालिका पंचायत मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे ग्रामपंचायत हाळदा तालुका कंधार या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व स्वच्छता विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

याप्रसंगी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रवीण घुले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांची मंचावर उपस्थित होते.

तर हळदा ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत बालिका सरपंच जयंती कांबळे, बालिका उपसरपंच पूनम कांबळे, ग्रामसेवक अपूर्णा कांबळे, सरपंच सौ.शोभाबाई हानमंत हळदेकर व ग्रामपंचायत अधिकारी जे.जी.शिंदे आदींची उपस्थिती होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker