चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार : आदमपूरच्या माजी महिला सरपंचासह ग्रामसेवक ताडकोले यांच्या विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बिलोली तालुक्यातील आदमपूर गावच्या महिला सरपंच व ग्रामसेवकाच्या संगणमताने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत 11 लाखाचा अपहार केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते शेख जाकेर अर्धापूरकर यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
आदमपुर ग्रामपंचायत कार्यालय ता.बिलोली जि. नांदेड येथील स्थानिक रहिवाशांनी या बाबत तक्रार केली असता त्या तक्रारीच्या अनुषंगने बिलोली पंचायत समिती अंतर्गत पाच सदस्यीय समिती गठीत करुन जायमोक्यावर जाऊन चौकशी करण्यात आली. त्यामध्ये गट विकास अधिकारी बिलोली, विस्तार अधिकारी बिलोली, विस्तार अधिकारी (कृषी) बिलोली, शाखा अभियंता बांधकाम विभाग बिलोली, कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु) नायगांव या पाच सदस्यी समितीने ग्रामपंचायत कार्यालयल आदमपुर येथे जाऊन कामांची व अभिलेखांची पडताळणी करुन ज्यामध्ये 14 वा वित्त आयोगाच्या निधीत आपले सरकार सेवा केंद्र, वॉटर फिल्टर खरेदी, पाणी पुरवठा पाईप लाईन दुरुस्ती, सि.सि.रस्ता, नाली व बेड, नाली बांधकाम, विद्युत दिवे बसविणे, मुरुम टाकणे, शाळेमध्ये सि.सि.करणे व शौचालय बांधकाम, अंगणवाडी दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य, आशा किट खरेदी अशा विविध कामांची तपासणी आणि अभिलेखांची पडताळणी केली असता.
त्यामध्ये तत्कालीन सरपंच पुजा नारायण चिंतले व ग्रामसेवक एस.एन. ताडकोले यांनी सन 2016 ते 2020 या कालावधीत शासकीय निधीचा कोणतीही कामे न करता कागदपत्राची कामे पूर्ण करुन कामे झाल्याची दर्शवुन कट कारस्थान रचुन संगणमत करून बनावट कागदपत्राआधारे व बिला आधारे शासकीय रक्कम 14 वा वित्त आयोगाच्या निधीचा स्वतःच्या फायद्याकरीता चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावुन शासनाच्या निधीचा आर्थीक नुकसान करुन 11 लाख एक हजार सत्यान्नव रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिध्द झाले.
यानंतरही सदर प्रकरणी कुठलीच कारवाई झाली नसल्याने माहिती अधिकारी कार्यकर्ते तथा अर्धापूर नगरपंचायतचे नगरसेवक शेख जाकेर यांनी आदमपुर ग्रामपंचायती मधील अनागोंदी कारभाराची व भ्रष्टाचाराची माहिती लागल्या वरुन या गोष्टीचा शोध घेऊन सर्व कागदपत्रे माहिती अधिकार मधुन हस्तगत करून माहिती मिळवली व बिलोलीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली.
शेख जाकेर यांचा अर्ज मंजुर करुन कलम 175(3) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे पोलिस स्टेशन पोलिस स्टेशन रामतीर्थ (शंकर नगर) ता. बिलोली यांना आरोपी विरुध्द कलम 318 (4), 337, 338, 3(5) of BNS अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून आदमपूरच्या तत्कालीन सरपंच पुजा नारायण चिंतले व ग्रामसेवक एस.एन. ताडकोले यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.