ताज्या बातम्यानांदेडनायगांव

राष्ट्रवादीचे बॅनर काढून टाकत शंकरनगर व नायगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध…

मोरे मनोहर

किनाळा :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ पाहून अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कडे माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी करावे अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडूनच निवेदन देण्यासाठी गेलेल्या घाडगेवरच भ्याड हल्ला करण्यात आला या घटनेचा शंकरनगर येथे दि.21 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरनगर तालुका बिलोली येथे लावण्यात आलेले राष्ट्रवादी पक्षाचे बॅनर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकत या घटनेचा निषेध केले.

राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ.मीनल पाटील खतगावकर यांना शुभेच्छा देणारे बॅनर आणी राष्ट्रवादीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची निवड झाल्याने त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेले बॅनर शंकरनगर येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध म्हणून काढून टाकत भ्याड हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची पक्षातून तात्काळ हाकालपट्टी करून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हणमंत पाटील वाडेकर, संतोष पाटील पुयड, दिगंबर पाटील देगलूरे, जगदीश पाटील वाडेकर, योगेश पाटील वाडेकर, विजय पाटील पूयड, मनोज वाडेकर, संतोष पाटील देगलूरे, गणेश रोकडे, विजय देगलूरे, हरी देगलूरे, साईनाथ देगलूरे, दत्ता पाटील कानोले, बालाजी पाटील देगलुरे आदिसह शंकरनगर परीसरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय छावा संघटना, शेतकरी पुत्र व सकल मराठा समाज यांच्या वतीने नायगाव शहरातील हेडगेवार चौक येथे सूरज चव्हाण याचा निषेध व्यक्त…

शेतकरी नेते तसेच अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.विजय घाडगे पाटील यांच्यावर काल सत्ताधारी पक्षातील सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्याड हल्ला करून मारहाण केली ही मारहाण व्यक्ती वर नसून शेतकऱ्यांच्या पोरांवर असून सतेत बसलेल्या लोकांना सतेचा गैरवापर करत असल्या बाबद व काल झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव तालुक्यातील अखिल भारतीय छावा संघटना, शेतकरी पुत्र व सकल मराठा समाज यांच्या वतीने नायगाव शहरातील हेडगेवार चौक येथे सूरज चव्हाण याचा निषेध व्यक्त केला.

व सूरज चव्हाण व त्यांच्या सहकार्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा या संधर्भात तहसीलदार व नायगाव पोलीस स्टेशनं यांना निवेदन देण्यात आले यावेळी छावा संघटनेचे व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी शेतकरी पुत्र व सकल मराठा समाज उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker