ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ पोलिसांचे तत्परतेमुळे वाचला जीव…

मोरे मनोहर

किनाळा :- रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांच्या सतर्कतेमुळे सायबर सेलच्या मदतीने किनाळा तालुका बिलोली येथील गंभीर जखमी अवस्थेतील बेशुद्ध अवस्थेत अज्ञात ठिकाणी पडलेल्या किनाळा तालुका बिलोली येथील युवकाचा शोध घेऊन प्राण वाचविले असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

सविस्तर माहिती अशी की किनाळा तालुका बिलोली येथील आनंदा परशुराम उगे वय 32 वर्षे राहणार किनाळा हे दिनांक 10 ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी 07:00 वाजल्यापासून घरी न आल्यामुळे त्यांचे नातेवाईक व गावातील इतर नागरिक व गावचे सरपंच विठ्ठल माने हे त्यांचा शोध घेत होते परंतु ते मिळून येत नव्हते त्यांच्याजवळ असलेला फोन लागत होता परंतु ते उचलतही नव्हते त्यामुळे नेमके कारण काय हे कोणालाही समजत नसल्याने रात्री 11:40 वाजता पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे सदर व्यक्ती मिसिंग आहे त्याचा फोन लागत आहे परंतु फोन उचलत नाही म्हणून तक्रार देण्याकरिता आले व त्यांनी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांना सदरची माहिती दिली.

सपोनी हराळे यांनी सायबर सेलच्या माध्यमातून तात्काळ माहिती घेऊन सदर इसम हा कुठे आहे याची माहिती फक्त 20 मिनिटात उपलब्ध करून सदर व्यक्तीचे लोकेशन शोधून काढून त्याला शोधले असता सदर तरुण हा नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या धुपा ते किनाळा हायवे रोडच्या बाजूला अंधारामध्ये जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडलेला मिळून आला.

त्यास कोण्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज असून याकडे जर वेळीच कोणी पाहिले नसते किंवा याचा शोध लागला नसता तर तो रात्रभर बेवारस अवस्थेत पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला असता मात्र या घटनेचा क्षणाचाही विलंब न करता रामतीर्थ पोलिसांनी दाखवलेल्या तत्पर सेवेबद्दल त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून त्यांच्या या कार्यामुळे आज एका मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या तरुणाचा जीव वाचला असुन गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणास तात्काळ नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या तरुणास पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवून देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker