शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; कुंडलवाडी येथे आश्रम शाळेच्या वसतिगृह अधिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

कुंडलवाडी :- शहरातील संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा वसतिगृह अधिक्षकांकडून विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी दि.१८ एप्रिल रोजी रात्री उशिरा आरोपी वसतिगृह अधिक्षक विरूद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात प्रोस्को व ॲट्रॉसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंडलवाडी शहरापासून माचनूर रोडवर संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळा असून ही शाळा स्थापन झाल्यापासून वादग्रस्त आहे. हि शाळा निवासी असून शाळेतील वसतिगृह अधिक्षक आरोपी गजानन राजरवार याने शाळेतील वर्ग सातवी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दि.९ एप्रिल २०२५ व ११ एप्रिल २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात असलेल्या शौचालयाजवळ अल्पवयीन मुलीस एकटी असल्याची संधी साधून आरोपी गजानन याने अल्पवयीन मुली चा डावा हाथ पकडून खूप आवडतेस माझ्यासोबत चल आपण कार मध्ये बसू म्हणून विनयभंग केला.
तसेच निवासी रूम मध्ये मैत्रिणी सोबत झोपली असताना वाईट हेतूने अंगाशी झटापट व छेडछाड केली अशी फिर्याद मुलीने कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी गजानन राजरवार याच्या विरोधात प्रोक्सो व अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी गजानन राजरवार हा फरार आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी धर्माबाद चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.