गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

चुकीच्या भु मॅपिंग मुळे डोणगाव खु.व डोणगाव बु.चे शेतकरी ईपीक पहाणी करण्यापासून वंचित

मोरे मनोहर

किनाळा :- डोणगाव खुर्द च्या टास्कमध्ये डोणगाव बुद्रुक चा नकाशा दिसत आहे यावरून दोन्ही गावाचे भु नकाशे परस्पर अदलाबदल भू मॅपिंग ईरर झाल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने जोपर्यंत नकाशा मॅपिंगची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत या दोन्ही गावाची ई पिक पाहणी करणे शक्य नसल्याने सदरील दोन्ही गावातील शेतकरी हे ई पीक पाहणी पासून वंचित असल्याने या दोन्ही गावाचा मॅपिंग नकाशा एन आय सी पुणे यांच्याकडे पाठवून तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे अशी मागणी दोन्ही गावातील ई पीक पाहणी सहाय्यकांनी तहसीलदार बिलोली यांच्या कडे दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केले आहे.

सविस्तर माहिती अशी की डोनगाव बुद्रुक येथील 705 शेतकरी ई पीक पहाणी टास्कमध्ये असाइन झाले आहेत परंतु ई पीक पाहणीमध्ये डोणगाव बुद्रुक ऐवजी डोणगाव खुर्दचा भु नकाशा जोडला गेल्यामुळे तांत्रिक त्रुटी निर्माण झाली आहे. या चुकीच्या पद्धतीने झालेल्या भू मॅपिंग नकाशा त्रुटीमुळे डोणगाव बुद्रुक चे 705 शेतकरी दिसन्या ऐवजी डोणगाव खुर्द चे 316 शेतकरी दाखवले जात आहेत. त्यामुळे डोणगाव बुद्रुकच्या 705 शेतकर्याऐवजी फक्त 316 शेतकरीच दिसतात व उर्वरित शेतकरी दिसतच नाहीत.

या चुकीच्या भू नकाशा मॅपिंग मुळे मागील वर्षी देखील डोणगाव खुर्द व डोणगाव बुद्रुक या दोन्ही गावातील अनेक शेतकऱ्यांची ई पिक पाहणीझाली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतातील मालाची विक्री करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागला यामुळे गेल्या वर्षापासून येथील शेतकरी चुकीचा भू मॅपिंग नकाशा तात्काळ दुरुस्त करून द्यावे अशी मागणी वारंवार शेतकरी करूनही याकडे मात्र प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.

डोणगाव खुर्द गावाच्या टास्कमध्ये डोणगाव बुद्रुकचा भू नकाशा दिसत असल्याने यावरून दोन्ही गावांचे भू नकाशे परस्पर अदलाबदल मॅपिंग ईरर झाल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने दोन्ही गावातील चुकीचा झालेला भु मॅपिंग नकाशा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत दोन्ही गावातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणे शक्य नसल्याने चुकीचा झालेला भु मॅपिंग नकाशा तात्काळ एन आय सी पुणे यांच्याकडे पाठवून दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी डोणगाव बुद्रुक येथील ई पिक पाहणी सहाय्यक संजय पांचाळ व डोणगाव खुर्द येथील ई पिक पाहणी सहाय्यक मठमवाड
कपिल यासह दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार बिलोली यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!