ताज्या बातम्यानांदेडनायगांव

संवेदनशील प्रकरणात सुरत पोलिसांनी नरसीच्या तरुणाला घेतले ताब्यात ; नरसीत खळबळ

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : पाकिस्तानी व्हाट्सएपच्या ग्रुपवरुन भारतातील हिंदूत्ववादी नेत्यासह इतरांना जीवे मारण्याची धमकी देवून भडकवण्याचा प्रकार केला व परदेशातून शस्त्रे मागवण्याची चँटींग सापडली असून या चँटींगमध्ये नरसी येथील तरुण सहभागी असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरत गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रविवारी सकाळी नरसी येथे आले होते. या पथकाने एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्याला नोटीस देवून सोडण्यात आले.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप पाकिस्तानातील वकास व सरफराज डोगर हे चालवत होते. त्यामध्ये सुरत येथील सोहेल टीमोल रा.सुरत व बिहार येथील शहनाज हे सामील होते. सदर आरोपीतांनी मिळून सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्षासह काही पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देऊन हिंदूंविरुद्ध भडकावण्याचे प्रकार केले आहेत आणि परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या चॅटिंग सुद्धा सापडल्या असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजले.

या गंभीर प्रकरणी सुरत सुरत शहर गु.र.नं 11210015240039/2024 कलम 153-A, 467, 468, 471, 120-B भा.दं.वि.सहकलम 66-D, 67, 67-A आय.टी.ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि या प्रकरणी अधिक खोलात जावून तपास करतांना आरोपीचे व इतरांचे व्हॉट्सॲप ग्रुप मधील चॅटिंग तपासणी करण्यात आली. यावेळी नरसी ता.नायगाव येथील मुस्लिम युवक शेख शकील शेख सत्तार हा देखील सहभागी असल्याचे आढळून आल्याने सुरत येथील पोलिसांच्या पथकाने आज दिनांक 12.05.2024 रोजी 10.00 वाजण्याच्या सुमारास नरसी गाठले.

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह आलेल्या पथकाने येथील युवक शेख शकील शेख सत्तार (वय18) वर्षे व्यवसाय शिक्षण (B.Sc.) यास चौकशी कामी ताब्यात घेतले आहे गुन्ह्याच्या चौकशी कामी ताब्यात घेतले असून सुरतकडे रवाना झाले आहेत. तर शेख शकीलच्या मित्राला नोटीस देवून सोडण्यात आले असल्याचे समजले आहे. सदरचे प्रकरण अतिशय संवेदनशील व गंभीर असल्याची चर्चा पोलीसांच्या वर्तूळात होत होती त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण अडकतात ते येणाऱ्या काळात दिसून येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker