ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जिल्ह्याच्या ठिकाणी ‘मध्यवर्ती’ मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन करणार – राऊत

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : गरजू रुग्णांना योजनेची माहिती व वेळेत अर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता ‘मध्यवर्ती’ कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामहरी भिमराव राऊत हे गुरुवारी नायगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. तसेच या कक्षाद्वारे ३५० कोटीची वैद्यकीय मदतही करण्यात आली आहेमहाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय मदत कक्ष मृतावस्थेत होता. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली.

या कक्षाच्या माध्यमातून दुर्धर रोगांवरील उपचार तसेच विविध शारीरिक अवयवांचे प्रत्यारोपणाकरिता एक लाख रुपयांची मदत करण्यात येत होती आता ही रक्कम दोन लाखापर्यंत करण्यात आली आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, तहसीलदार कार्यालयाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रुग्णांचे आधार कार्ड, लहान बाळासाठी आईचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड, आजाराचे रिपोर्ट, प्रत्यारोपणासाठी शासकीय समितीची मान्यता आणि पेपर स्कॅन करून पीडीएफ फाईल ई-मेल आयडी वर पाठवणे अशा अटींची पूर्तता करावी लागते असे सांगितले.

राज्यभरातील गरजूंना मदत मिळाली परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेचा प्रसार न झाल्याने गरजू रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात मदत करता आली नाही. त्यासाठीच मी तालुकानिहाय दौरे करत आहे असे यावेळी राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना योजनेची माहिती मिळावी, मदतीचा अर्ज कसा भरावा आणि तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरावर ‘मध्यवर्ती’ वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असून याबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे असेही यावेळी राऊत यांनी सांगितले. यावेळी शिवराज पाटील होटाळकर व या कक्षाचे जिल्हा प्रमुख शिवाजी पन्नासे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker