ताज्या बातम्यानांदेडनायगांव

येलूरच्या तरुणाचा तळणी येथे विज पडल्याने झाला मृत्यू

अंकुशकुमार देगावकर

नायगाव :- पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबले असता झाडावर विज पडल्याने एक जन जागीच गतप्राण झाला तर एक जण थोडक्यात बचावला आहे. घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान बिलोली तालुक्यातील तळणी येथे घडली. मयत व्यक्ती हि कंधार तालुक्यातील येलूर येथील असून दोघे भाऊ मोटारसायकलवर गावाकडे जात होते.

कंधार तालुक्यातील येलूर येथील शंकर पंढरी धर्मेकर (२५) हे लहान भाऊ शिवाजी पंढरी धर्मेकर (२२) यांच्यासह मोटारसायकलवर दुपारी ३ वाजताच्या दरम्यान नरसी मार्गे गावाकडे निघाले होते. बिलोली तालुक्यातील तळणी जवळ आल्यानंतर वाजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मोटारसायकल रोडच्या बाजूला उभ करुन पावसाचा बचाव करण्यासाठी रमण माऊले यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली जात होते.

तेवढ्यात पुन्हा विजांचा गडगडाट झाल्याने शंकर धर्मेकर हे झाडाखाली आसरा घेतला तर त्यांचा भाऊ शिवाजी धर्मेकर हा काही अंतरावर असताना त्या बाभळीच्या झाडावर विज पडली यात शंकर धर्मेकर हे जागीच गतप्राण झाले तर त्यांचा भाऊ शिवाजी थोडक्यात बचावला.

शंकर धर्मेकर हा ट्रक्टर चालक होता आणि कुटुंबाची जबाबदारीही त्याच्यावरच होती मात्र बिलोली तालुक्यात अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker