ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

कौठा येथे धाडसी दरोडा : रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने पळविले

New Bharat Times नेटवर्क

कौठा : कौठा ता. कंधार येथे शनिवारी पहाटे ती वाजताच्या दरम्यान बोलेरो वाहणातून आलेल्या पाच जनांच्या टोळीने एका व्यापाऱ्याच्या घरात दरोडा टाकला असून. झोपेत असलेल्या पती पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून व मारहाण करुन दहा ते १५ लाखाची रोकड व विस तोळे सोने पळवल्याचे समजले आहे. या खळबळजनक घटनेने परिसरात भितिचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी कंधार पोलीस पोहचले आहेत. विशेष म्हणजे मागच्या वर्षी कौठा येथे व गडगा येथे बोलेरो गाडीतून आलेल्या टोळीनेच धुमाकूळ घातला होता.

कंधार तालुक्यातील कौठा येथे गजानन श्रीहरी येरावार या व्यापाऱ्याचे मुख्य रोडवर कृषी दुकान असून दुकानाच्या वर घर आहे. शनिवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरी धाडसी दरोडा पडला. बोलेरो वाहणातून आलेल्या पाच लोकांच्या सशस्त्र टोळीने घरात प्रवेश केला. घरात आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिजोरीची चाबी मागितली. चाबी न दिल्याने गजानन येरावार यांना मारहाण केली त्यामुळे त्यांनी तिजोरीची चाबी दिली. तोंडाला मास्क लावून आलेल्या सशस्त्र सशस्त्र दरोडेखोरांनी तिजोरीतील दहा ते १५ लाखाची रोकड आणि २० तोळे सोने घेवून पसार झाले.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक या दरोड्याच्या घटनेत मोठी रक्कम चोरीला गेली असावी असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कंधार पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे परिसरात गुन्हेगारी वाढली आहे असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेची माहिती समजल्यावर कंधार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker