ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

महसूलच्या तिजोरीवर डल्ला … तहसिलदारानी भरला आपला गल्ला ?

⚡ स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी गुलदस्त्यात ⚡ अनेक गावच्या सरपंचांची तक्रार

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : बिलोली येथिल तहसिल कार्यालयाचे वादग्रस्त तहसिलदार गेल्या काही दिवसापासून कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहेत, त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्य सरकारचा करोडो रुपयाचा महसूल बुडवून शासनाची दिशाभूल करत आपली स्वतःची तिजोरी भरवून घेतली असल्याने त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करून कारवाई करण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्या तहसिलदार निळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

तहसिलदार निळे यांच्या विरोधात वाढत असलेल्या तक्रारी वरील नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काही वृत्तपत्र व राजकीय व्यक्तींची मदत घेत आपल्या चांगल्या बातम्या प्रकाशित करवून घेत असल्याच्या चर्चा तालुक्यात जोर धरत आहेत.

बिलोली येथिल तहसिल कार्यालयात श्रीकांत निळे यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून तहसिलदार पदाची जबाबदारी स्विकारली असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात रेती, मुरूम, माती अशा अवैध व्यवसायिकांसोबत हात मिळवणी करून राज्य शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडविला आहे, यामध्ये सांगायाचे झाले तर 15 मे 2022 या दिवशी तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी आपल्या अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन सगरोळी शासकीय रेती घाटात मध्यरात्री सुरु असलेली अवैध रेती वाहतूक करणारी जवळपास 38 ट्रक व 4 जेसीबी यांसह बनावट पावती बुक पकडून मोठी कारवाई केली होती.

मात्र सदर अधिका-यांच्या पथकाने केलेली कारवाई महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी राज्य सरकारची दिशाभूल करून खोटा अहवाल सादर करून स्वतःचे हीत साधत सर्व वाहने विना कारवाई सोडून दिली, यासोबतच त्यांनी आजपर्यंत एकाही अवैध रेती वाहतूक करणारी वाहन पकडून कारवाई केली नाही, त्यामुळे त्यांचा दिवसेंदिवस मुजोरपणा वाढत गेला असल्याने सर्व काही मनमानी पद्धतीने चालू आहे, यामध्ये लोकप्रतिनिधी यांना उद्धट बोलून त्यांचा अपमान करत असल्याने एका सरपंचाने पोलीस ठाण्यात सदर अधिका-यावर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार केली.

आमदार अंतापूरकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीस गैरहजर राहून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे या आढावा बैठकीत त्यांच्या विरोधात तहसिलदार निळे मुर्दाबाद, तहसिलदार हटाव बिलोली बचाव अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. एकंदरीत तहसिलदार निळे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गैरकारभार करून राज्य सरकारचे मोठया प्रमाणात नुकसान केले असून त्यांच्या बिलोली येथिल कार्यकाळाची चौकशी करून त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकांनी केली आहे.

सदर तहसिलदार यांच्या विरोधात वाढत असलेल्या तक्रारी वरील लक्ष विचलीत करण्याच्या उद्देशाने काही वृत्तपत्र व राजकीय व्यक्तींना सोबत घेऊन आपण कसे चांगले काम केलोत अशा बातम्या प्रकाशित करून घेत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत तहसिलदार निळे यांनी बिलोली तहसिल सह बिलोली नगर परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी पद सुद्धा गेल्या एक ते दीड वर्षापासून सांभाळत असल्याने या दोन्हीही कार्यकाळाची जिल्हाधिकारी चौकशी करणार की तहसिलदार निळे यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker