ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पुण्यात नौकरी करण्यासाठी जातो म्हणून घरातून निघालेल्या तरुणाने केली आत्महत्या

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नौकरीसाठी घरुन पुण्याकडे निघालेल्या मांडणी येथील तिरुपती उर्फ किरण लांडगे या तरुणाने दि.१५ रोजी रात्री उशिरा येळी महाटी येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरच्या तरुणाचा मृतदेह दि.१६ रोजी मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला असल्याची माहिती मिळाली. सदरचा तरुण बेकारी आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

उच्च शिक्षण झालेल्या नायगाव तालुक्यातील मांडणी येथील तिरुपती उर्फ किरण लांडगे या तरुणास अनेक महिण्यापासून नौकरी मिळत नव्हती. सरकारही नौकरीची जाहिरात काढत नसल्याने उद्विगन झाला होता. त्यातच नौकरी नसल्याने घरातही वडील रागराग करत होते. काल दि.१५ रोजी वडिलांनी काहीतरी कामधंदा कर म्हणून रागावले होते आणि कुठेतरी काम कर म्हटले. त्यामुळे तिरुपतीने मी पुण्यात कामाला जातो म्हटला. मुलगा पुण्याला कामासाठी जातो म्हटल्याने वडीलांनीच खर्चासाठी पैसे दिले होते.

वडीलांनी दिलेले पैसे, शैक्षणिक कागदपत्रे आणि कपडे घेवून तो नौकरी करण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी दि.१५ ला रात्री आठ वाजताच्या दरम्यान मांडणी येथून निघाला. मात्र तो पुण्याला न जाता तो रात्री तो येळी महाटी येथील पुलावर आला व सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे, शासन जागा भरत नाही, जाहिरात काढली तर भरती करून घेत नाही आणि केलीच भरती तर नियुक्ती पत्र देत नाही अशा अतिशय वस्तुतिथी आणि बोलक्या शब्दात चिट्टी लिहून पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी मारली.

येळी येथील पुलावर बँग दिसली आणि बँगमध्ये कागदपत्रे दिसल्याने सदरची माहिती मांडणी येथे वजीरगावच्या नागरिकांनी कळवली मांडणीच्या ग्रामस्थांनी येळी महाटीच्या पुलावर गेले. रात्रीलाच शोध मोहीम राबवली पण शोध लागला नाही. त्यामुळे दि.१६ रोजी मृतदेह मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या प्रकरणी मुदखेड पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker