ताज्या बातम्यानांदेडनायगांव

श्रावण भिलवंडेंना शुभेच्छा देण्यासाठी १९ जुलैला नरसीत चाहत्यांची गर्दी उसळणार

लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी नरसी सजली,भावी आमदारचेही बॅनर झळकले

शेख आरीफ नरसीकर

नायगाव : नायगाव विधानसभेचे नेते तथा भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी १९ जुलैला नरसी येथे हजारो समर्थक येण्याची शक्यता आहे यामुळे नरसी नगरी सजली असून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी जागोजागी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे भिलवंडे हे आमदार व्हावे यासाठी भावी आमदार म्हणून नरसी चौकात बॅनर झळकत आहे विशेष म्हणजे अवघ्या दोन ते अडीच महिण्यावर येऊन ठेपलेल्या
विधानसभा निवडनूकामुळे श्रावण भिलवंडेच्या या वाढदिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असून भाजपातील अंतर्गत गटबाजी आणी भिलवंडे यांच्या राजकारणातील संयमी भुमीका हे बरेच काही सांगुन जाते यामुळे यंदा नक्कीच श्रावण बहरणार अशी मनोकामना भिलवंडे समर्थक करत आहेत.

दि.१९ जुलै २०२४ रोजी श्रावण भिलवंडे यांचा वाढदिवस आहे यामुळे नरसी परीसरात भिलवंडेंना शुभेच्छा देण्यासाठी शेकडो शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे कठिन परिस्थिति नायगाव तालुक्यात भाजपाचा झेंडा हातात घेऊन पक्षवाढीसाठी काम करणारे श्रावण पाटील भिलवंडे हे नायगाव विधानसभेचे प्रमुख दावेदार ठरतात राजकारणात सयंमी व गाढे अभ्यासक असणारे श्रावण भिलवंडें यांचे नायगाव विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात समर्थक असून येत्या १९ जुलै २०२४ रोजी शुक्रवारी त्यांचा वाढदिवस आहे.

यामुळे शुभेच्छा देण्यासाठी भिलवंडे समर्थक व त्यांच्या चाहत्यांची नरसी येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे नायगाव विधानसभा निवडनुकीत अनेक नेते आमदार होण्यासाठी भेटीगाठी सुरू केले असून पक्षाने संधी दिली तर नेतृत्व करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे परंतु सयंमी भुमिका घेऊन समाजकारणासह राजकारण करणार्या श्रावण भिलवंडे आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker