नांदेड-कौठा- मुखेड हायवेवर अपघातात एकजण ठार…

बालासाहेब शिंदे
मारतळा :- नांदेड-कौठा- मुखेड NH 161 राज्य मार्गावर मोटारसायकलला पिकअप धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाल्याने यात दुचाकीस्वाराचा जाग्यावरच मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेली महिला देखील गंभीर जखमी झाली आहे हा अपघात नांदेड-कौठा- मुखेड रस्त्यावर सकाळी ११.३० वाजता लाडका नागबर्डी चौकात झाला.
लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील मोहन रामजी शिंदे व त्यांच्या पत्नी कान्होपात्रा मोहन शिंदे हे दोघेजण दुचाकीवर आपल्या मुलीकडे चिखली येथे कामानिमित्त जात असताना ते लाडका गावाकडून नागबर्डीकडे जात होते त्याचवेळी चौकात हळदा गावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका बोलेरो पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले त्यात मोहन रामजी शिंदे (वय ५२) वर्ष यांच्या डोक्याला जबर मार लागून जाग्यावरच मोठा रक्तस्राव ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
तर त्यांच्या पत्नी कान्होपात्रा यांचा एक पाय तुटून बाजूला पडला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले मात्र दवाखान्यात डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले तर त्यांच्या पत्नीवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहवार उत्तरीय तपासणी करून शव नातेवाईकाकडे देण्यात आले सायंकाळी जोमेगाव येथे मयत मोहन शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात्ताप पत्नी दोन मुली, दोन जावई, नातवंडे असा परिवार आहे.