ताज्या बातम्यानांदेडबिलोली

दहा रुपये देण्यापेक्षा दोन प्रेमाचे शब्द बोला – तृतीयपंथी किर्तनकार हभप समाधान महाराज

मोरे मनोहर

किनाळा :- तृतीयपंथी समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असुन आम्ही तृतीयपंथी जर कोणाला जीव लावला तर त्यासाठी जीव देण्यासही तयार असतो परंतु “या जगात खोट्याचाच बाजार चालला आहे खऱ्याला न्याय मिळत नाही.समाजातील तृतीय पंथीयांविषयी असलेले गैरसमज उपेक्षा आणि छेडछाड यावरही त्यांनी भाष्य करताना तृतीयपंथीयांना रस्त्यावर दहा रुपये देण्यापेक्षा त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोला असा भावनिक आशावाद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पहिले तृतीयपंथी किर्तनकार हभप समाधान महाराज श्री गोंदा दौंडकर यांनी जिगळा नं,2 तालुका बिलोली येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनरुपी सेवेत सांगितले.

बिलोली तालुक्यातील जिगळा क्रमांक दोन येथे दि. 12 ते 19 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दि. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 9 चे किर्तनकार म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पहिले तृतीयपंथी किर्तनकार हभप समाधान महाराज श्री गोदां दौंडकर यांना किर्तनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी ते आपल्या किर्तनरुपी सेवेत संत परंपरेचा संदर्भ देताना त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा उल्लेख केला आणि “आपुला तो एक देव” हा संदेश देत भगवंताच्या नामस्मरणातच खरे सुख असल्याचे सांगितले. मोक्षप्राप्तीसाठी साधना, नामस्मरण आणि भगवंतावरील निष्ठा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिगळा नंबर दोन येथे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी किर्तनकार यांचे अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन आयोजित करण्यात आले असल्याने या किर्तन रुपी सेवेचा लाभ घेण्यासाठी जिगळा व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच तृतीयपंथी पहिले हभप महाराज यांच्या किर्तनरुपी सेवेसाठी परिसरातील अनेक तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सायंकाळी जिगळा येथील तृतीयपंथी फरीदा बकस उर्फ गुरूमाय यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker