ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र
बहुजन समाज पार्टीची नांदेड येथे तातडीची बैठक

नांदेड :- बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ठीक 1.00 वाजता बी.एस.पी. भवन, कावळे कॉम्प्लेक्स, गणेश नगर वाय पॉईंट, नांदेड येथे महाराष्ट्र प्रभारी मा.राजारामजी साहेब, महाराष्ट्र अध्यक्ष मा.सुनील डोंगरे साहेब, महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष शिंदे साहेब तसेच मराठवाडा झोन प्रभारी मनीषभाऊ कावळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी बहुजन समाज पार्टीच्या आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



