डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवावी – कार्यकर्त्याची मागणी

मोरे मनोहर
किनाळा :- भारतीय जनता पक्षाने डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देऊन वेटींगवर ठेवले पुन्हा येणा-या विधानसभा निवडणूकीपुर्वी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे अन्यथा नायगाव विधानसभेतून डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी अपक्ष म्हणुन निवडणूक लढवावी अशी भावना खतगावकर समर्थक कार्यकर्त्यानी ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्याकडे करत असल्याने दादा काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी सन 2014 मध्ये बिनशर्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन अत्यंत विस्कळीत झालेल्या भाजपला मोठ्याप्रमाणात उभारी दिली अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात आणले त्यामुळे लोकसभा निवडणूकीत नांदेडमधून कॉंग्रेस पराभूत झाली पण खतगावकरांनी भाजपा वाढवण्यास नांदेड जिल्हयात जेवढी मेहनत केली त्या तुलनेत भाजपाने त्यांना राजकीय शक्ती दिली नाही.
सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत नायगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना उमेदवारी देण्यासंबंधी भाजपाने समर्थतता दर्शविली होती त्याअनुषंगाने डॉ. मीनल पाटील यांनी दोन वर्षापुर्वीपासून कार्यकर्त्याचा मोठा संच तयार करुन संपुर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजुन काढला होता नायगाव, धर्माबाद, उमरी या तीन्ही तालूक्यातून डॉ. मीनल पाटील यांच्याबद्दल लोकमतातून सहानुभूती निर्माण झाली होती पण भाजप नेतृत्वाने पुन्हा ऐनवेळी सन 2014 च्या निवडणूकीत पराभुत झालेले राजेश पवार यांनाच उमेदवारी दिली आणि डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला.
दरम्यानच्या कोवीड काळात देगलूर विधानसभेचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन झाले आणि या पोटनिवडणूकीत स्व. रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापुरकर यांना निवडून आणायचे असेल तर भास्करराव पाटील खतगावकर यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणुन काँग्रेस नेतृत्वाने खतगावकरांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन घेतला आणि जितेश अंतापुरकरांना खतगावकर यांनी मोठ्यामताधिक्याने निवडूनही आणले.
राज्याच्या विकासासाठी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी स्वतः अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचदिवशी भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील नांदेड जिल्हयाच्या विकासासाठी अशोकरावांना सहकार्य करणार असल्याचे पत्रकार परिषद घेवुन जाहीर केले होते. अशोकरावांच्या भाजपा प्रवेशाला सर्वप्रथम भास्करराव पाटील खतगावकरांसह माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा व माजी आ. अविनाश घाटे यांना देखील या पत्रकार परिषदेला बोलावुन या तिघांनी अशोकरावांच्या नेतृत्वाखाली भाजपात काम करण्याचे मान्य केले.
लोकसभा निवडणूक डॉ. मीनल पाटील खतगावकर या काँग्रेस पक्षाकडून लढवण्याची तयारी यापुर्वीच केली होती त्यास अशोकराव चव्हाण यांनीही दुजोरा दिला होता त्यामुळे अशोकरावांच्या भाजपा प्रवेशामुळे डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना भाजपा कडून लोकसभेचे उमेदवारी मिळेल असे वाटले होते मात्र भाजपाने त्यांना वेटींगवरच ठेवले व पुन्हा प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी दिल्या गेली त्यावेळी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांने दिले होते पण अद्यापही डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर भाजपाकडून वेळोवेळी अन्यायच होत असल्याची भावना खतगावकर समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.
सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाकडून डॉ. मीनल पाटील खतगावकर या शंभर टक्के खासदार म्हणून एकमेव उमेदवार असताना भास्करराव पाटील खतगावकर यांनी राज्याच्या विकासासाठी अशोकराव चव्हाण यांच्या पाठिमागे आपली सर्व ताकद उभा करून भाजपाचे तन-मन-धनाने काम केले जर दादा भाजपात गेले नसते तर काँग्रेस पक्षाकडून नांदेड जिल्ह्याच्या खासदार म्हणून डॉक्टर मीनल पाटील खतगावकर ह्या राहिल्या असत्या असे अनेक मतदारसंघातील कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.
येणा-या विधानसभा निवडणूकीपुर्वी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे अन्यथा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी खतगावकर समर्थक कार्यकर्त्यानी भास्कररावजी पाटील खतागवकर यांच्याकडे केली असून खतगावकरांनी देखील पुन्हा अन्याय झाल्यास निश्चीत कार्यकर्त्याच्या भावनेची कदर करुन आपण निर्णय घेऊ असे सांगितल्याचे कळते त्यामुळे यावेळेस भाजपाकडुन डॉ मिनलताई खतगावकरांवर अन्याय केल्यास नायगाव विधानसभेतून डॉ. मीनलताई पाटील खतगावकर या अपक्ष उमेदवार म्हणून”फिक्स” असल्याची भावना खतगावकर समर्थक व्यक्त करत आहेत.
दादा नांदेड लोकसभेत भाजपात जाऊन डॉ.मीनल पाटील खतगावकर यांची खासदारकी गमवावी लागली सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उच्चशिक्षित व राजकारणातील अनुभव असलेल्या डॉ.मिनल पाटील खतगावकर यांना विधान परिषदेवर न घेतल्यास दादांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मीनल पाटील खतगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरवावे असी भुमिका खतगावकर समर्थकदादा कडे करत असल्याने दादा काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.