शिक्षक संघटनेच्या अनुदानित कर्मचाऱ्यांना प्रचलित वाढीव टप्पा देण्यात यावा – प्रा.रविंद्र चव्हाण

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : प्रचलित वाढीव टप्पा मिळण्यासाठी राज्यातील शिक्षक आंदोलन करत आहेत. त्यामुळे अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना प्रचलित धोरणानुसार वाढीव अनुदान टप्पा वितरित करण्यात यावा अशी मागणी प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शिक्षक अनेक दिवसांपासून प्रचलित वाढीव टप्पा मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत बरेच कर्मचारी 20 टक्के 30 टक्के अनुदानावर अहोरात्र पणे ज्ञानदानाचे कार्य करत आहे तरी हे सरकार त्यांचा प्रचलित वाढीव टप्पा मंजूर करत नसल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षक समन्वय संघ नांदेड यांच्या तर्फे अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना प्रचलित धोरणानुसार वाढीव अनुदान टप्पा वितरित करण्यात यावा या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनास खासदार वसंतराव बळवंतरावजी पा.चव्हाण यांचे प्रतिनिधी व एक संस्थाचालक म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते प्रा.रविंद्र वसंतरावजी पा.चव्हाण यांनी या आंदोलनात भर पावसात सहभाग घेतला.
शिक्षकांच्या प्रत्येक लढ्यात सोबत राहीन असा शब्द दिला या आंदोलनातया मा.प्रा.जांभरूणकर मा.प्रा.गोविंदराव मेथे व सर्व अंशतः अनुदानित शिक्षक मंडळी आंदोलनासाठी बसलेली सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते.