गावाकडच्या बातम्याधर्माबादनायगांव

धर्माबाद शहरातील धाड प्रकरणात ‘त्या’ सावकारावरील कारवाई गुलदस्त्यात : उलटसुलट चर्चेला उधाण

सौ.मिना भद्रे

धर्माबाद : शहरातील मुख्य रोडवर असलेल्या एका बड्या सावकाराच्या घरावर सहकार विभागाने धाड मारली. या घटनेला २४ तासाचा कालावधी झाला तरी अद्याप पंचनामाच पुर्ण न झाल्याने एक तर रक्कम अमाप असावी अन्यथा प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न असावा अशी चर्चा होत आहे. वास्तविक सहकार विभागाच्या आजपर्यंतच्या कोणत्याच कारवाईत पारदर्शकता नसते आणि धर्माबाद शहरातील हे प्रकरणही २४ तासापासून गुलदस्त्यातच असल्याने कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धर्माबाद शहरातील गल्लीबोळात खाजगी सावकारी फोफावली आहे. त्यामुळे दररोज हातावर पोट असणाऱ्यांनची प्रचंड लुट होत आहे. खाजगी फायनान्स करणाऱ्यांची दादागिरी वाढत असताना सहकार खात्याची कधीच करवाई होत नसते. खाजगी सावकारीत बुडून गेलेल्या एखाद्या पीडित व्यक्तीने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू होतात. पण कारवाईस कुठे पूर्ण विराम द्यावा याची जाणीव या अधिकाऱ्यांना आसल्याने खाजगी सावकारांच्या मुसक्या आवळन्यासाठी दुधारी तलवार असलेला हा कायदा केवळ सॉफ्ट कारवाई करून धार कमी केली जाते.

शुक्रवारी दुपारी सहकार विभागाने या खाजगी सावकारी करणाऱ्या एका बड्या व्यापाऱ्याच्या घरात धाड टाकली. अचानक धाड टाकल्याने सदरचा सावकार कोणा कोणाला व्याजाच्या माध्यमातुन लुटला हे समोर आलेच असेल.त्याचबरो त्याने किती टक्के दराने व्याज आकरले हे समोर आलेही असेल. अव्वाच्या सव्वा व्याज आकारुन अमाप संपत्ती जमवली याचा पूर्ण उलगडा होण्यासाठी सदरच्या कारवाईची व्यापक प्रसिद्धी होणे अपेक्षित असते. आणि त्यातूनच इतर पीडित लोकांना सविस्तर माहिती आणि तक्रार करायला ऊर्जा मिळते पण प्रत्यक्षात मात्र उलटे घडले आहे. धाड टाकून २४ तास संपले तरीही हा विभाग माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. म्हणून ही धाड म्यानेज स्वरूपाची तर नव्हे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या धाडीत दरमहा शेकडा दहा रुपये दराने पैसे वसूल केल्याची प्राथमिक माहिती आहे त्यात खरे किती खोटे किती तसेच अशाच प्रकारे आणखी किती जणांची लूट केली हा पण सस्पेन्स कायम आहे. या खाजगी सावकार कडे सावकारी करण्याचा परवाना होता का तसेच तो नियमित रीनिवल करत होता किंवा नाही त्याच बरोबर रजिस्टर वरील सर्व कर्ज घेतल्येल्यांची माहिती सहकारी संस्था कार्यालयास कळविली होती किंवा नाहीत असे अनेक प्रश्न सद्या तरी अनुत्तरीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker