ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड उत्तर विधानसभेसाठी महेश देशमुखांची काॅग्रेसकडून दावेदारी

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाचे नांदेड शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी आज पक्षाकडे केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी च्यावतिने मतदारसंघनिहाय ईच्छूकांकडून अर्ज मागणी सुरु असल्याने आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम यांच्याकडे शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी आपला मागणी अर्ज दिला आहे.

यावेळी नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे, शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, अब्दुल गफार, आनंद कल्याणकर, बालाजी चव्हाण, अनु.जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, युवकचे शंकर शिंदे, दिपक हुजुरिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महेश देशमुख हे विद्यार्थी चळवळीपासून युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून काॅग्रेस पक्षाशी जोडले गेलेले असून समाजकारणातून राजकीय वाटचालीला त्यांचे प्राधान्य आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून काॅग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विजयात योगदान देत त्यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपल्या तरोडा (बु.) या मूळ गांवासह शहरी व ग्रामीण भागात मोठे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

काॅग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी व या भागातील सर्व समाजघटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने ते या मतदारसंघात प्रबळ दावेदार ठरु शकतात.

तसेच देशमुख यांना संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत या ठिकाणी कॉँग्रेसला नक्कीच विजयाची संधी राहील असा स्थानिक मतदार व जनतेसह विश्लेषकांचा सूर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker