देगलूर बिलोली मतदारसंघातून काँग्रेसने बौद्धांना उमेदवारी ध्यावे गंगाधर सोंडारे यांचे नाव चर्चेत
मोरे मनोहर
किनाळा :- अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असुन यामध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस आय कमिटी चे कार्याध्यक्ष गंगाधर सटवाजीराव सोंडारे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाशी निगडित व निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचे या मतदारसंघात सामान्य मतदारातून नाव आघाडीवर असल्याचे दिसून येत असले तरी काँग्रेस पक्षाकडून यावेळेस तरी बौद्धांना उमेदवारी देनार का असा प्रश्न पडला असुन या वेळेस काँग्रेस पक्षाने बौद्धाचा उमेदवार न दिल्यास याचे परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावे लागतील असे बोलले जात आहे.
सन 2009 मध्ये देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून गंगाधर सटवाजी सोंडारे यांचे नाव काँग्रेस पक्षाकडून जवळपास निश्चित असल्याचे मानले जात होते पण भास्करराव पाटील खतगावकर यांनी ऐनवेळी मुंबई वरून आयात उमेदवार आनला गेल्याने सोंडारे यांची उमेदवारी कटली होती.
देगलूर बिलोली मतदारसंघातील गंगाधर सोंडारे आपल्या थडी बोरगाव या खेडेगावापासून राजकीय कारकीर्द सुरू केले ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आय कमिटीचे सरचिटणीस होते सुकांनो समिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य नांदेड जिल्हा काँग्रेस आय कमिटी मागासवर्गीय विभागाचे जिल्हा अध्यक्ष होते तसेच संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्थेचे चेअरमन नांदेड जिल्हा युवक काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष समन्वय समिती बिलोली तालुक्यात सदस्य अशा अनेक पदावर काँग्रेस पक्ष वाढवण्याचे कार्य केले.
ते देगलूर बिलोली मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजातून सच्चा आणि इमानदार कार्यकर्ता असलेले व काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपशी जवळीकता करत राज्यसभा मिळवली आहे.
खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासोबत न जाता गंगाधर सोंडरे यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून गेल्या लोकसभा निवडणुकीत झंजावती प्रचार करून काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांना विजय मिळून देण्यास पूर्ण प्रयत्न केले.त्यांच्या कुटूंबातील तिसरी पिढी काँग्रेससोबत असलेला एकमेव एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून गंगाधर सोंडारे बोरगावकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे वडील सटवाजीराव सोंडारे हे नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले होते ते स्वर्गीय डॉ. शंकररावजी चव्हाण केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत त्यांचे निकटचे संबंध होते.
महाराष्ट्र शासनाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. नांदेड रत्न पुरस्कार महात्मा कबीर समता परिषद नांदेड शिवरत्न पुरस्कार छावासंघटना नांदेड महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित असलेला देगलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा म्हणून गंगाधर सोंडारे यांना ओळखले जाते गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने बौद्ध उमेदवारासाठी आजपर्यंत एकाही व्यक्तीला उमेदवारी दिली नाही पण गंगाधर सोंडारे हे देगलूर बिलोली मतदारसंघात सर्व लोकांना परिचित असलेला उमेदवार आहे.
गंगाधर सोंडारे यांना उमेदवारी दिल्यास देगलूर बिलोली मतदारसंघातील विकासाला चालना मिळेल असे सध्या नागरिकांमध्ये चर्चा असून काँग्रेस पक्षाकडून यावेळेस बौद्धाला उमेदवारी न दिल्यास याचे परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावे लागतील असे सामान्य जनतेतून बोलल्या जात आहे.